‘फालतू विधाने करण्‍यापेक्षा…’ व्‍यंकटेश प्रसादांनी टोचले टीम इंडियाचे ‘कान’ | पुढारी

'फालतू विधाने करण्‍यापेक्षा...' व्‍यंकटेश प्रसादांनी टोचले टीम इंडियाचे 'कान'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाच्या पराभवानंतर व्यंकटेश प्रसाद यांनी भारतीय संघाच्‍या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या संघाविरुद्धची मालिका गमावणे लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ( Venkatesh prasad tweet)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 2-3 अशा फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनीही भारतीय संघाच्या वृत्तीवर आणि व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्यंकटेश प्रसादने यापूर्वीही भारतीय संघावर हल्ला चढवला आहे आणि खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर टीका केली आहे. मात्र, त्यांचे ट्विट कोणाला लक्ष्य करण्यासाठी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याला फक्त संघाचे भले करायचे आहे.

Venkatesh prasad tweet : काय म्‍हणाले व्‍यंकटेश प्रसाद…

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या पराभवानंतर व्यंकटेशने ट्विट केले की, “भारत हा अलीकडच्या काळात अत्यंत मध्यम दर्जाचा मर्यादित षटकांचा संघ आहे. काही महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आशा आहे की, ते फालतू विधान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करतील.”

व्यंकटेशच्या ट्विटवर एका चाहत्याने लिहिले की, वेस्ट इंडिजचा संघ टी-२० नव्हे तर एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर आहे. प्रत्युत्तरादाखल व्यंकटेशने लिहिले, “केवळ ५० षटकेच नाही, तर वेस्ट इंडिज संघ गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला होता. भारताची खराब कामगिरी पाहून वाईट वाटते आणि प्रक्रियेच्या वेशात दडपले जाते. ”
पराभवासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे…

एका चाहत्याने व्यंकटेश यांना भारतीय संघ व्यवस्थापन आणि T20 कर्णधारपदाबद्दल त्यांचे मत विचारले. त्यावर त्याने म्‍हटलं आहे की, “पराभवासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे. प्रक्रिया आणि अशा शब्दांचा आता गैरवापर होत आहे. भारताला त्यांचे कौशल्य सुधारण्याची गरज आहे. त्यांच्यात जिंकण्‍याची मानसिकतेची कमतरता आहे. गोलंदाज फलंदाजी करू शकत नाहीत, फलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीत. हे महत्त्वाचे आहे की तुम्ही हो म्हणणाऱ्या लोकांचा शोध घेऊ नका. तुम्ही आणि कोणीतरी तुमचा आवडता खेळाडू असल्याने आंधळे होऊ नका, अधिक चांगले पहा.” असेही त्‍यांनी सुनावले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button