Latest
IND vs WI T20 : निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध वेस्टइंडिज टी२० मालिकेतील निर्णायाक सामना आज (दि.१३) खेळवला जाणार आहे. हा सामना वेस्टइंडिजमधील ब्रोवार्ड रिजनल पार्क, स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकत दोन्हीही संघ मालिका विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत.
वेस्टइंडिजचा संघ – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ
भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल

