चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल | पुढारी

चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल

मियामी; वृत्तसंस्था :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना उद्या (शनिवारी) अमेरिकेतील लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मियामीला पोहोचले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. यानंतर भारताने तिसरा सामना 7 गडी राखून जिंकला. आता चौथा सामना शनिवारी आणि पाचवा सामना रविवारी होणार आहे. हे दोन्ही सामने लॉडरहिल येथे होणार आहेत. बीसीसीआयने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचे खेळाडू पहिल्यांदा विमानात असल्याचे दिसत आहेत. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि यजुवेंद्र चहल हे प्रवासाचा आनंद घेताना दिसले. व्हिडीओमध्ये गिल काहीतरी खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आवेश खान, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन देखील दिसत आहेत.

Back to top button