Brij Bhushan Singh in Court | महिला कुस्तीपटूंना मिठी मारण्यामागे वाईट हेतू नव्हता; बृजभूषण सिंह यांचा न्यायालयात दावा

Brij Bhushan Singh In Court
Brij Bhushan Singh In Court

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलेला मिठी मारण्यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. एखाद्या महिलेला कोणताही वाईट हेतू न ठेवता मिठी मारणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिल्लीतील न्यायालयात स्पष्ट केले. (Brij Bhushan Singh In Court) महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बृजभूषण सिंह यांनी मॅजिस्ट्रेट हरजीत सिंह जसपाल यांच्यासमोर त्यांच्या वकिलामार्फत आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे. आरोपी खासदार सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चितीबाबत न्यायालयात बुधवारी (दि.१०) युक्तीवाद झाला. सिंह यांच्या वतीने वकील राजीव मोहन यांनी न्यायालयाला सांगितले की, "बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेले आरोप खून जूने आहेत. तक्रारदार गेल्या पाच वर्षांपासून मोकळेपणाने फिरत आहेत. गेल्या पाच वर्षांत एकदाही पुढे आले नाहीत. मात्र, पाच वर्षांनंतर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला धोका आहे, तर हे वैध ठरत नाही. शिवाय, न्यायालयाला या आरोपांवर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. कारण, विदेशात हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे." (Brij Bhushan Singh In Court)

'येथे बहुतांश प्रशिक्षक पुरुष आहेत'

राजीव मोहन युक्तीवाद करताना म्हणाले, "कुस्ती हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये बहुतांश प्रशिक्षक पुरुष असतात. क्वचितच महिला प्रशिक्षक पहायला मिळतात. यश मिळाल्यानंतर आनंदाच्या भरात कोणी एखाद्या खेळाडूला मिठी मारत असेल, तर तो गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकत नाही. (Brij Bhushan Singh In Court)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news