चेन्नईच्या मैदानात आज भारत-पाक भिडणार | पुढारी

चेन्नईच्या मैदानात आज भारत-पाक भिडणार

चेन्नई : वृत्तसंस्था : चेन्नईमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत आज (बुधवारी) भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत भारताचा हा पाचवा सामना असून, चार सामन्यांत 3 विजय आणि एका बरोबरीसह भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आज हॉकीच्या मैदानावर होणार्‍या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दोन संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्याचबरोबर अंतिम-4 मध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल; अन्यथा चीनविरुद्ध जपानच्या पराभवासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. या स्पर्धेतील पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकून भारतीय संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला आहे.

त्याचवेळी टीम इंडियाचा जपानविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला. 6 संघांच्या या स्पर्धेतील गुणतालिकेत टीम इंडिया 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ 4 सामन्यांतून एक विजय, एक पराभव आणि दोन अनिर्णीतांसह 5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटचा सामना 9 ऑगस्ट 2023 रोजी चेन्नईच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे; तर पाकिस्तानसाठी हे करा किंवा मराचे युद्ध आहे. कारण, जपानचा शेवटचा सामना कमकुवत चीनविरुद्ध आहे आणि तेथे विजय मिळवून चौथ्या स्थानावर जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

अशा स्थितीत 11 ऑगस्ट रोजी होणार्‍या उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामना हे समीकरण पाहिल्यास पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत भारताला पराभूत करावे लागेल; अन्यथा जपानच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

पाकिस्तानी प्रशिक्षकांनी आपण या सामन्यात विजय मिळवू, असा आशावाद व्यक्त केला आहे. आम्हाला भारताच्या कुमकुवत बाजू माहीत असून, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून खेळ करू, असे ते म्हणाले.

Back to top button