Mitchell Marsh Captain : ऑस्ट्रेलियन संघात नेतृत्व बदल, मिचेल मार्श नवा टी-20 कर्णधार! | पुढारी

Mitchell Marsh Captain : ऑस्ट्रेलियन संघात नेतृत्व बदल, मिचेल मार्श नवा टी-20 कर्णधार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचेल मार्शची (Mitchell Marsh Captain) ऑस्ट्रेलियाचा (Team Australia) नवा टी-20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो संघाचे नेतृत्व करेल. वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला टी-20 मधून विश्रांती देण्यात आल्याने मार्शकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कांगारू संघ द. आफ्रिकेत 3 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे (SA vs AUS Series). जून 2024 मध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषकाकडे पाहता मार्शला संघाचा कायमस्वरूपी टी-20 कर्णधारही बनवले जाऊ शकते.

स्पेन्सर, हार्डी आणि शॉर्टसाठी संधी

द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कांगारू संघात डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे. त्याच्यासोबत मॅथ्यू शॉर्ट आणि अॅरॉन हार्डी यांनाही संधी मिळाली आहे. शॉर्ट हा बिग बॅश लीगच्या गेल्या मोसमात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. हार्डी ऑस्ट्रेलियाच्या वनडे वर्ल्डकप संघाचा भाग आहे. (Mitchell Marsh Captain)

मार्श (Mitchell Marsh) अद्याप कायमसाठी कर्णधार नाही

मिचेल मार्शला सध्या टी-20 संघाचे कायमस्वरूपी कर्णधारपद देण्यात आलेले नाही. तो केवळ द. आफ्रिका दौऱ्यातील 3 टी-20 सामन्यांसाठीच संघाचे नेतृत्व करणार आहे. 30 ऑगस्ट, 1 आणि 3 सप्टेंबर रोजी हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ वनडे वर्ल्डकपपर्यंत एकही टी-20 सामना खेळणार नाही. विश्वचषकानंतर संघ भारतात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. (Mitchell Marsh Captain)

कमिन्सवर वनडे आणि कसोटीची जबाबदारी

2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान आरोन फिंच संघाचा कर्णधार होता. विश्वचषकानंतर तो निवृत्त झाला. या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाने एकही टी-20 सामना खेळलेला नाही, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन टी-20 कर्णधाराचे नावही जाहीर केले नाही. आता मिचेल मार्शला (Mitchell Marsh) कर्णधार बनवण्यात आले आहे, कमिन्सवर वनडे आणि कसोटीची जबाबदारी दिल्याने मार्शला पूर्णवेळ टी-20 कर्णधारही ठेवता येईल, असे काहींचे मत आहे.

Back to top button