

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (दि.६) गयाना येथे होणार आहे. प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याकडे टीम इंडियाची नजर आहे. त्रिनिदादमध्ये पहिला टी-20 सामन्यांत भारताचा चार धावांनी पराभव झाला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरेल; पण पावसामुळे त्याचे मनसुबे बिघडू शकतात. (IND vs WI 2nd T20)
गयानामध्ये रविवारी पाऊस होऊ शकतो. AccuWeather सामन्यावेळी पावसाची शक्यता ७१ टक्के आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी तापमान ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहिल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ( IND vs WI 2nd T20)
फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला. सलामीवीर ईशान किशन (०६), शुभमन गिल (०३), सूर्यकुमार यादव (२१), हार्दिक (१९) आणि संजू सॅमसन (१२) यांच्या सुमार कामगिरीमुळे पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला १५० धावांचे आव्हान पार करता आले नाही. .
सध्या भारतीय संघात आयपीएल स्टार्सचा समावेश आहे, परंतु ते त्यांच्या प्रतिभेला न्याय देऊ शकलेले नाहीत. भारताला दुसरा टी-२० जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. भारतासाठी सूर्यकुमारला मोठी खेळी खेळणे आवश्यक आहे.
वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), कायले मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमस.
भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिष्नोई, उमरान मलिक, आवेश खान अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
हेही वाचा;