आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघाचे भारतात आगमन
चेन्नई, वृत्तसंस्था : गुरुवार (दि. 3) पासून खेळवल्या जाणार्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ अटारी-वाघा सीमारेषेमार्गे चेन्नईत दाखल झाला. ही स्पर्धा 3 ते 12 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तानसह जपान, कोरिया, चीन व मलेशिया हे संघदेखील सहभागी होत आहेत.
सर्व संघ आपापसात राऊंड रॉबिन पद्धतीने 5 सामने खेळतील आणि या फेरीअखेर पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, अशी स्पर्धेची रचना आहे. यंदा या स्पर्धेत भारतीय संघ गुरुवारी चीनविरुद्ध लढतीने आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा करेल.
आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेची रूपरेषा
तारीख लढत वेळ
3 ऑगस्ट कोरिया वि. जपान दुपारी 4 वा.
3 ऑगस्ट मलेशिया वि. पाकिस्तान सायंकाळी 6.15 वा.
3 ऑगस्ट भारत वि. चीन रात्री 8.30 वा.
4 ऑगस्ट कोरिया वि. पाकिस्तान दुपारी 4 वा.
4 ऑगस्ट चीन वि. मलेशिया सायंकाळी 6.15 वा.
4 ऑगस्ट भारत वि. जपान रात्री 8.30 वा.
6 ऑगस्ट चीन वि. कोरिया दुपारी 4 वा.
6 ऑगस्ट पाकिस्तान वि. जपान सायंकाळी 6.15 वा.
6 ऑगस्ट मलेशिया वि. भारत रात्री 8.30 वा.
7 ऑगस्ट जपान वि. मलेशिया दुपारी 4 वा.
7 ऑगस्ट पाकिस्तान वि. चीन सायंकाळी 6.15 वा.
7 ऑगस्ट कोरिया वि. भारत रात्री 8.30 वा.
9 ऑगस्ट जपान वि. चीन दुपारी 4 वा.
9 ऑगस्ट मलेशिया वि. कोरिया सायंकाळी 6.15 वा.
9 ऑगस्ट भारत वि. पाकिस्तान रात्री 8.30 वा.
11 ऑगस्ट 5-6 क्रमांकासाठी लढत दुपारी 3.30 वा.
11 ऑगस्ट पहिली उपांत्य लढत सायंकाळी 6 वा.
11 ऑगस्ट दुसरी उपांत्य लढत रात्री 8.30 वा.
12 ऑगस्ट 3-4 क्रमांकासाठी लढत सायंकाळी 6 वा.
12 ऑगस्ट फायनल रात्री 8.30 वा.