न्यूझीलंड संघात भारतीय वंशाचा आदित्य अशोक | पुढारी

न्यूझीलंड संघात भारतीय वंशाचा आदित्य अशोक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड आणि यूएई विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय वंशाचा लेगस्पिनर आदि अशोकला घोषित संघात संधी देण्यात आली आहे. तो ब्लॅक कॅप्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आदि अशोक याचे पूर्ण नाव आदित्य अशोक आहे. तो मूळचा भारतातील चेन्नईचा असून बालपणातच न्यूझीलंडला गेला होता. या युवा खेळाडूने न्यूझीलंडला जाऊन क्रिकेटमध्ये आपला ठसा कसा उमटवला आणि आंतरराष्ट्रीय संघात आपली वाटचाल केली. 5 सप्टेंबर 2002 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेला आदित्य अशोक लहानपणीच आपल्या कुटुंबासह ऑकलंडला गेला होता.

किवी संघ पुढील महिन्यात यूएई आणि इंग्लंड विरुद्ध अनुक्रमे तीन आणि चार टी-20 मालिका खेळणार आहेत. किवी संघ 17 ते 20 ऑगस्टदरम्यान दुबई आणि 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान यूएईला जाणार आहे. आदित्यशिवाय फलंदाजीतील अष्टपैलू फॉक्सक्राफ्टचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जो 2016 मध्येच दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडला गेला होता. याशिवाय काईल जेम्सनचेही संघात पुनरागमन झाले आहे.

न्यूझीलंडचा संघ

टीम साऊदी (कर्णधार), आदि अशोक, चॅड बोवेस, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, डीन फॉक्सक्रॉफ्ट, काईल जेमिसन, कोल मॅककॉनची, जिमी नीशाम, रचिन रवींद्र, मिचेल सँटेनर, टीम शेफर्ट, हेन्री शिपले, विल यंग.

Back to top button