सर्बियाच्या विक्रमवीर नोवाक जोकोविचने इटलीच्या जानिक सिन्नेर याला ६-३, ६-४, ७-६ असे सरळ सेटमध्ये पराभूत करुन विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
उपांत्य फेरीतील सामन्यातील पाहिला गेम जोकोवीचने मिळवून थाटात सुरवात तर केलीच, पाठोपाठ सिन्नर ची सर्व्हिस देखील भेदली. या शिवाय त्याने अतिशय आक्रमक खेळ करत पाहिला सेट ६-३ असा आरामात खिशात टाकला. दुसऱ्या सेट मधे स्वतः च्या सर्व्हिस वर दोघांनी १-१ गेम घेतले. पण जोकोवीचने चपळ हालचाली करून सिन्नर ची सर्व्हिस पुन्हा भेदली. जोकोवीच ने क्रॉस फटके, प्लेसमेंट चा बहारदार वापर करून दुसरा सेट देखील ६-४ असा आपल्या नावे केला. वेग, प्लेसमेंट, दिशा, बॅक हॅन्ड, क्रॉस फटके या सर्व अस्त्रांचा मारा जोकोने केला.
तिसरा सेट मात्र अटीतटीचा झाला. सिन्नेरने पहिल्या दोन गेम मधे अधिक्य मिळविले. पण जोकोवीच ने पवित्रा बदलला. त्याने नेट जवळ फटके मारायला सुरवात करून सिन्नेरला जाळ्यात पकडले. अखेर, अनुभव, एकाग्रता, नियोजन, कौशल्य या जोरावर जोकोवीचने टाय ब्रेकर मधे तिसरा सेट जिंकून अंतिम फेरी गाठली.