वर्ण द्वेष प्रकरणावर अखेर क्विंटन डिकॉक बोलला | पुढारी

वर्ण द्वेष प्रकरणावर अखेर क्विंटन डिकॉक बोलला

दुबई : पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डिकॉक याने गुडघे टेकून वर्ण द्वेषाचा विरोध करण्यास नकार दिल्याप्रकरणी संघाची आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. क्विंटन डिकॉक टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने दिलेल्या गुडघे टेकवून वर्ण द्वेषाचा विरोध करण्याचे निर्देश फेटाळून लावले होते.

क्रिकेट साऊथ आफ्रिका संघटनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर क्विंटन डिकॉकचा माफीनामा ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये त्याने जर मी गुडघे टेकून निषेध करण्याने लोकांचे प्रबोधन होईल आणि दुसऱ्याचे आयुष्य चांगले होईल तर मी मला तसे करायला अत्यानंद होईल असे सांगितले.

क्विंटन डिकॉक आपल्या माफीनाम्यात म्हणतो ‘मी माझ्या संघ सहकाऱ्यांची आणि चाहत्यांची माफी मागून सुरुवात करतो. जर मी गुडघे टेकून निषेध केल्याने दुसऱ्यांचे प्रबोधन होईल आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात याने चांगला फरक पडेल तर मला असे करण्यास अत्यानंद होईल.

हेही वाचा : 

तो पुढे म्हणाला की, ‘गैरसमजातून मला वर्णद्वेशी ठरवण्यात आल्याने मला वेदना झाल्या आहे. याचा माझ्या कुटुंबावर माझ्या गर्भवती पत्नीवर परिणाम झाला आहे. मी वर्णद्वेशी नाही. माझ्या मनालाच हे ठाऊक आहे आणि मला वाटते की जे मला ओळखतात त्यांना देखील हे माहित आहे.’

ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा सादर करणारा डिकॉक पुढे म्हणतो, ‘वेस्ट इंडीज विरुद्ध न खेळून मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता, विशेष करून वेस्ट इंडीज संघाचा तर नाहीच. काही लोकांना हे समजणार नाही की हे सगळे आम्ही सामन्यासाठी निघताना घडले आहे.’

क्विंटन डिकॉक वेस्ट इंडीज विरुद्ध न खेळण्याबाबत म्हणतो

‘माझ्यामुळे झालेला गोंधळ, निर्माण झालेला राग आणि वेदना याबद्दल मी माफी मागतो. मी या महत्वाच्या विषयावर अजूनपर्यंत बोललो नव्हतो. पण, मला वाटते की मला माझी बाजू मांडली पाहिजे.’ क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडीज बरोबर न खेळण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगितले.

तो म्हणाला ‘प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि समानता हे महत्वाचे आहेत. आपल्याला काही अधिकार आहेत आणि ते महत्वाचे आहेत या शिकवणीतच माझी जडणघडण झाली आहे. ज्यावेळी मला सांगण्यात आले की आम्ही जसे सांगितले आहे तसेच करायचे त्यावेळी मला वाटले की माझे हे अधिकार हिरावून घेण्यात येत आहे.’

त्यानंतर डिकॉकने आपला माफीनामा संघ सहकारी आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांचे आभार मानत संपवला. तो म्हणाला ‘मी माझ्या संघ सहकाऱ्यांचे मला समर्थन दिल्याबद्दल आभार मानतो. विशेषकरुन माझा कर्णधार टेम्बा जो आता एक उत्कृष्ट नेतृत्व बनत आहे त्याचे आभार.’ डिकॉक पुढे म्हणतो की, ‘तर कर्णधार, संघ आणि दक्षिण आफ्रिकेने मला संघात स्थान दिले तर मला पुन्हा एखदा माझ्या देशाकडून खेळण्यास आनंद होईल.’

Back to top button