वर्णभेद विरोधी अभियान : क्विंटन डिकॉक याने आफ्रिकन बोर्डाचे फेटाळले निर्देश | पुढारी

वर्णभेद विरोधी अभियान : क्विंटन डिकॉक याने आफ्रिकन बोर्डाचे फेटाळले निर्देश

दुबई : पुढारी ऑनलाईन

टी२० वर्ल्ड कपचा ( T20 World Cup ) फिवर आता हळूहळू चढत चालला आहे. उपांत्य सामन्यात स्थान मिळविण्यासाठीची स्पर्धा अधीक तिव्र होताना दिसत आहे. दोन ग्रुपच्या माध्यमातून १२ संघ एकमेकांशी भीडत आहेत. काही रोमांच्चकारी निर्णय लागत आहेत. तर एैतिहासिक विजय देखिल नोंदवले जात आहेत. तसेच मैदानावरील सामन्यांसह मैदानाबाहेरील गोष्टींची व निर्णयांची चर्चा रंगू लागली आहे. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात कर्णधार क्विंटन डिकॉक याने स्वत:लाच संघातून बाहेर ठेवले. याची चर्चा फक्त क्रिकेट जगतातच नाही तर संपूर्ण जगात आणि सर्व स्तरामध्ये त्याची चर्चा होवू लागली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्द दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने ज्या सुचना खेळाडूंना दिल्या होत्या. त्याचे पालन खुद्द त्या संघाच्या कर्णधाराने अर्थात क्विंटन डिकॉकनेच केलेले नाही. तसेच त्या नियमांचे पालन न करता क्विंटन डिकॉक याने सामनाच न खेळण्याचा निर्णय घेत तो बाहेर बसला. डिकॉकच्या या निर्णयानंतर टेंम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना खेळला आणि जिंकला.

क्विंटन डिकॉकच्या अशा निर्णयामुळे अद्याप बोर्डाने कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बोर्ड लवकर काही तो निर्णय घेईल. पण यामुळे डिकॉक उर्वरीत वर्ल्ड कपचे सामने खेळणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

त्याचे झाले असे की, सध्या वर्ण भेदाच्या विरुद्ध जागतिक पातळीवर अभियान सुरु आहे. त्याचे नाव ब्लॅक लाईव्हज् मॅटर्स ( बीएलएम ) असे आहे. या अभियानातंर्गत सामना सुरु होण्याच्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने सर्व खेळाडूंना एका गुडघ्यावर बसण्याचे निर्देश दिले होते. भारत आणि पाकिस्तान मधील सामन्यात भारताने देखिल अशी कृती करत भारतीय संघाने या अभियानाला पाठिंबा दर्शविला होता. तसेच पाकिस्तानच्या खेळाडुनी छातीवर हात ठेऊन या अभियानास पाठिंबा दर्शविला होता.

जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने त्यांच्या खेळाडुंना गुडघे टेकून या अभियानाला समर्थन देण्यास सांगितले तेव्हा अशी कृती करायला क्विंटन डिकॉकने नकार दिला व या सामन्यातून माघार घेतला. यानंतर डिकॉकच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. क्रीडारसिक, विश्लेषक आणि समालोचक डिकॉकच्या या निर्णयाची चर्चा करु लागले. सर्व समाज माध्यमांमध्ये देखिल डिकॉकचा ट्रेंड सुरु झाला.

डिकॉकने अशा प्रकारचा निर्णय घेऊन स्वत: समोर अडचणी उभ्या केल्या आहेत. अद्याप बोर्डाने कोणताही निर्णय घेतला नसला तरी बोर्डाने अधिकृतरीत्या सांगितले आहे की, व्यवस्थापन समितीचा अहवालाची वाट पहात आहोत. त्यानंतरच त्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच इतर खेळाडुंनी या अभियानाच्या समर्थनात कृती केल्याबद्दल बोर्डाने खेळाडुंचे आभार देखिल मानले.

Back to top button