विनेश फोगटला मिळेना हंगेरीचा व्हिसा | पुढारी

विनेश फोगटला मिळेना हंगेरीचा व्हिसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : काही काळापूर्वी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आता मैदानावर परतण्याच्या तयारीत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. या खेळांच्या चाचण्या लवकरच होणार आहेत. आंदोलनला बसलेल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात जायचे होते, त्यासाठी त्यांना परवानगी मिळाली. तीन वेळची कॉमनवेल्थ चॅम्पियन विनेश फोगटच्या अडचणी वाढल्या आहे, तिला हंगेरीला जाण्यासाठी व्हिसा मिळू शकला नाही.

कझाकिस्तानमधील बिश्केक येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी विनेश शनिवारी निघणार होती; परंतु तिचा पासपोर्ट अद्याप हंगेरियन दूतावासात अडकला आहे. विनेशकडे ई-व्हिसा आहे. या प्रकरणाची माहिती क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली. साई अधिकार्‍यांनी परराष्ट्र मंत्रालयाला हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले.

साक्षी मलिक आणि बजरंग पोहोचले

कझाकिस्तानला विनेश फोगटसोबत धरणे आंदोलनात उपस्थित असलेले बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकही कझाकिस्तानला रवाना झाले आहेत. बजरंगसोबत त्याचे फिजिओ अनुज गुप्ता, पार्टनर जितेंद्र किन्हा आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग तज्ज्ञ काजी किरण आहेत. त्याचवेळी साक्षी मलिकसोबत तिचा पती सत्यव्रत कादियानही आहे.

Back to top button