आजचे राशिभविष्य (दि.२६ जून २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२६ जून २०२३)

मेष
मेष
मेष : आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या द़ृष्टीने उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता.

 

वृषभ
वृषभ
वृषभ : क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त राहाल. रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये चांगल्याप्रकारे व्यवहार करा.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन : तुमच्याद्वारे दिलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.

 

कर्क
कर्क
कर्क : एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. वेळेला पैशाइतकेच असणारे महत्त्व जाणत असाल, तर क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी पावले उचला.

 

सिंह
सिंह
सिंह : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. स्वतः साठी खूप वेळ मिळेल.

 

राशिभविष्य
कन्या
कन्या : मित्रांचा आधार लाभेल आणि ते आनंदी ठेवतील. जीवनाच्या वाईट काळात पैसा कामी येईल म्हणून, पैशांची बचत करण्याचा विचार करा.

 

 

तुळ
तुळ
तुळ : बुद्धिमत्ता नीट वापरली, तर फायदेशीर ठरेल. ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रिय व्यक्ती काहीतरी करेल.

 

वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्चिक : तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, असे काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात कराल.

 

राशिभविष्य
धनु
धनु : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल.

 

मकर
मकर
मकर : कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल.

 

कुंभ
कुंभ
कुंभ : मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा.

 

मीन
मीन
मीन : तुम्ही दुःखी व्हाल. आज ही मनःस्थिती अशीच राहू शकते. चुकीच्या संवादामुळे कदाचित त्रास होऊ शकतो; पण चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक होईल.

Back to top button