INDvsPAK : भारताला हरवलं तर पाकिस्तान टीमला किती पैसे मिळणार? | पुढारी

INDvsPAK : भारताला हरवलं तर पाकिस्तान टीमला किती पैसे मिळणार?

दुबई : पुढारी ऑनलाईन

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ( INDvsPAK ) २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये भारतला पराभूत करणे आतापर्यंत तरी कधीही जमलेले नाही. टी २० वर्ल्डकप असो किंवा एकदिवसीय वर्ल्डकप असो पाकिस्तान दर वर्षी भारताला पराभूत करण्याच्या वल्गना करतो मात्र पराभूत होऊनच पॅव्हेलियनमध्ये परततो.

यंदाच्या वर्षी तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाने भारताला पराभूत केले तर बोनस रक्कम देण्याचीही घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तान ( INDvsPAK ) अनेक वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये एकमेकांच्या सामोरे ठाकले आहेत. दोन्ही संघ टी २० वर्ल्डकपची सुरुवातच आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळून करणार आहेत. एकदिवसीय आणि टी २० वर्ल्डकपमधील या दोघांमधे झालेल्या सामन्यांचे रेकॉर्ड काढले तर भारताने पाकिस्ताला १२ वेळा मात दिली आहे. तर पाकिस्तानला एकदाही भारताला मात देता आलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पीसीबीने बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानची टीम टीम इंडियाला मात देण्यात यशस्वी झाली तर त्यांना सामन्याच्या मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम बोनस म्हणून मिळणार आहे.

INDvsPAK : पाकिस्तानला किती मिळाणार?

पाकिस्तानी खेळाडूंना एका सामन्यासाठी पाकिस्तानी चलनानुसार ३ लाख ३८ हजार २५० रुपये मिळतात. जर या संघाने इतिहास बदलत भारताला मात दिली तर त्यांना जवळपास पाच लाखाच्या वर रक्कम मिळाले. मात्र भारतीय चलनानुसार या पाच लाखाचे मुल्य अर्ध्यावर येते. म्हणजे पाकिस्तानने भारताचा पराभव केला तर त्यांना भारतीय चलनानुसार २ लाख १४ हजार ९९२ रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा : 

INDvsPAK :  तुलनेत तरीही टीम इंडिया पाक खेळाडूंवर भारी

जर पाकिस्तानच्या खेळाडूंना सामना जिंकल्यानंतर बोनससह मिळणाऱ्या रक्कमेची आणि भारतीय संघाला एका टी २० सामन्यासाठी मिळणाऱ्या सामना मानधनाची तुलना केली तर टीम इंडिया बरीच भारी पडते. टीम इंडियातील खेळाडूंना एका टी २० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. त्यामुळे बोनस कमावणाऱ्या पाकिस्तानचे खेळाडू भारतीय चलनाच्या गणितानुसार टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मागेच असणार आहेत. कारण भारतीय खेळाडूंना एका सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनाचे रुपांतर पाकिस्तानी चलनात केले तर त्याची किंमत ७ लाख रुपये होते.

INDvsPAK : पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूंसाठी फायद्याचे गणित मांडले

मिळालेल्या माहितीनुसार जर पाकिस्तानी संघाने टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या संघाला मात दिली तरी त्यांना सामन्याच्या मानधनाच्या पन्नास टक्के बोनस मिळणार आहे. जर पाकिस्तान टी २० वर्ल्डकप जिंकते तर पीसीबी सगळ्या खेळाडूंच्या सामना मानधनात ३०० टक्के वाढ करणार आहे. पीसीबीने या आकर्षक घोषणेनंतर पाकिस्तानी टीम टी २० वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करते याची उत्सुकता वाढली आहे.

Back to top button