Purple Cap : मोहम्मद शमीने पटकावली पर्पल कॅप | पुढारी

Purple Cap : मोहम्मद शमीने पटकावली पर्पल कॅप

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 16व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचवे विजेतेपद मिळवले. या शानदार कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 जेतेपद पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली. दरम्यान, आयपीएलच्या २०२३ च्या या हंगामात एकाच संघातील खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावली आहे. मोहम्मद शमीने १७ सामन्यांमध्ये सर्वाधिक २८ विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे. तर गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने ऑरेंज कॅप पटकावली आहे.

आयपीएलच्या २०२३ या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

मोहम्मद शमी – १७ सामने – २८ विकेट्स 

मोहित शर्मा – १४ सामने – २७ विकेट्स 

राशिद खान – १७ सामने – २७ विकेट्स 

शुभमन गिल ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी

गुजरात टायटन्सचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज शुभमन गिल याने आयपीएल २०२३ च्या यंदाच्या हंगामात अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने या हंगामात १७ सामने खेळत ८९० धावांत केल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्याने तो ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्यात विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. दरम्यान, विराट कोहलीनंतर या यादीत शुभमन गिलचे नाव असणार आहे. (Orange Cap 2023)

आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरोधात २० चेंडूमध्ये ३९ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. शिवाय, शुभमन गिल ऑरेंज कॅप पटकावणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्याने ३ शतक आणि ४ अर्धशतक ठोकत सर्वाधिक ८९० धावा केल्या आहेत. याशिवाय गिल एका हंगामात सर्वाधिक चौकार लगावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात ८५ धावा केल्या आहेत. (Orange Cap 2023)

एका हंगामात जास्त धावा करणारे खेळाडू (Orange Cap 2023)

१. विराट कोहली – ९७३ धावा – २०१६
२. शुभमन गिल – ८९० धावा – २०२३
३. जोस बटलर – ८६३ धावा – २०२२

हेही वाचंलत का?

Back to top button