

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएल हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवला जाणार होता. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आता आयपीएल २०२३ चा अंतिम सामना सोमवारी (दि.२८) खेळवण्यात येणार आहे, (IPL Final 2023)
आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचे नेतृत्व कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनी करणार आहे, तर गुजरातची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहेे. आयपीएलचा उद्घाटनाचा सामना या दोन संघांमध्येच रंगला होता. आता शेवटची त्यांच्या लढतीनेच होत आहे. गुरू-शिष्याच्या या लढाईत कोण बाजी मारणार, हे सोमवारी कळणार आहे. (IPL Final 2023)
गुजरातला अंतिम फेरीपयर्र्ंत पोहोचवण्यात सलामीवीर शुभमन गिल याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या शतकाच्या जोरावर गुजरातने मुंबईला हरवले होते. धोनीच्या चाणाक्ष डोक्यातून शुभमनसाठी कोणते प्लॅन बाहेर पडतात ते पहावे लागेल. गुजरात टायटन्स हे घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. (IPL Final 2023)