WTC IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया-भारताचा संघ निश्चित; जाणून घ्या अंतिम १५ | पुढारी

WTC IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया-भारताचा संघ निश्चित; जाणून घ्या अंतिम १५

पुढारी ऑनलाईन डेस्क :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताचा संघ निश्चित झाला आहे. दोन्ही संघांनी रविवारी (दि.२८) त्यांच्या अंतिम १५ खेळाडूंची यादी ‘आयसीसी’कडे सुपूर्द केली आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी त्यांच्या १७ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. मात्र, आता ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मूळ १७ खेळाडूंच्या संघात दोन कपात केली असून ७ जूनपासून ओवलमध्ये भारताविरुद्ध होणार्‍या १५ खेळाडूंना मैदानात उतरवणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १५ खेळाडूंच्या गटात स्थान मिळाल्यानंतर भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. (WTC IND vs AUS)

यशस्वी जयस्वालला राखीव खेळाडू म्हणून संधी (WTC IND vs AUS)

राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघांनी ३ खेळाडूंची निवड केली आहे. तर ऑस्ट्रेलियाने २ खेळाडू राखीव म्हणून ठेवले आहेत. के.एल.राहुलला दुखापत झाल्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेता युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याचा राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडला वगळून राखीव खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. (WTC IND vs AUS)

ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रायव्हस हेड, जोश इंग्लीस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नेथन लायन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

राखीव खेळाडू – मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ

भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)

राखीव खेळाडू – यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार सूर्यकुमार यादव (WTC IND vs AUS) 

हेही वाचलंत का?

Back to top button