MI चा डाव फिफ्टीविना अपूर्ण! IPL Playoff मध्ये नवा विक्रम

MI चा डाव फिफ्टीविना अपूर्ण! IPL Playoff मध्ये नवा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Playoff : आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये बुधवारी (दि. 24) मुंबई इंडियन्स (MI)ने लखनौ सुपर जायंट्स (LSG)चा धुव्वा उडवत शानदार विजय मिळवला. याचबरोबर रोहित शर्माच्या संघाने क्वालीफायर-2 मध्ये दिमाखात एन्ट्री मारली.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 182 धावा केल्या. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावण्यात यश आले नाही. एमआयकडून अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 23 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 41 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय 'मिस्टर 360' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 33 धावा फटकावल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

मुंबईचा डाव एकाही खेळाडूच्या फिफ्टीविना अपूर्ण राहिला असून संघाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये (IPL Playoff) वैयक्तिक फिफ्टी न होताही सर्वाधिक धावांचा टप्पा गाठणा-य मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पाच वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. एसआरएचने आयपीएल 2018 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 6 गडी गमावून 178 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी एसआरएचच्या एकाही फलंदाजाने फिफ्टी करत आली नव्हती. अखेर तो सामना चेन्नईने 8 विकेट राखून जिंकला आणि विजेतेपद पटकावले.

वैयक्तिक फिफ्टीशिवाय IPL Playoff मधील सर्वोच्च धावसंख्या :

182/8 – MI विरुद्ध LSG (चेन्नई 2023 – क्वालिफायर 2)
178/6 – SRH विरुद्ध CSK (मुंबई 2018 – फायनल)
174/7 – SRH विरुद्ध KKR (कोलकाता 2018 – क्वालिफायर 2)
165/6 – RR विरुद्ध MI (कोलकाता 2013 – क्वालिफायर 2)
163/5 – CSK विरुद्ध RR (मुंबई डीवायपी 2008 – फायनल)

लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे ग्रीन आणि सूर्या वगळता एकाही खेळाडूला 30 चा टप्पा ओलांडता आला नाही. टिळक वर्माने 26 आणि नेहल वढेराने 23 धावांचे योगदान दिले. नेहलने 12 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले आणि मुंबईला 180 च्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली. सलामीवीर इशान किशनने 12 चेंडूत 15 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 10 चेंडूत 11 धावा केल्या. लखनौकडून नवीन-हल-हकने चार षटकांत 38 धावांत चार बळी घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news