MI vs LSG IPL 2023 : मुंबईचा ‘हा’ खेळाडू ठरेल मॅचविनर; हरभजन सिंगचा दावा

MI vs LSG IPL 2023
MI vs LSG IPL 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा क्वालिफायर १ मध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, आयपीएल २०२३ च्या हंगामात एलिमिनेटर सामना बुधवारी (दि.२४) खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियमवर खेळवण्यात येईल. दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगने मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूबाबत मोठे विधान केले आहे. (MI vs LSG IPL 2023)

मुंबई आणि लखनौच्या संघासाठी आजचा सामना 'करो या मरो' असणार आहे. पाच वेळेस चॅम्पियन बनलेला संघ लखनौवर बरोबर फायनलमध्ये पोहचण्यासाठी भिडणार आहे. अशावेळी मुंबई इंडियन्ससाठी अनुभवी फिरकीपटू पियुष चावला चांगली कामगिरी करु शकतो. स्टार स्पोर्ट्शी बातचीत करताना भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने पियुष चावला लखनौसाठी घातक ठरु शकतो, असे म्हटले आहे. (MI vs LSG IPL 2023)

पीयुष चावलाची आयपीएल २०२३ मधील कामगिरी (MI vs LSG IPL 2023)

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फिरकीपटू पीयुष चावलाने आयपीएलच्या या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. आपल्या फिरकीने त्याने विरोधी संघांना चांगलेच नाचवले आहे. ३४ वर्षीय पीयुष चावलाने युवा खेळाडूंपासून अनेक दिंग्गजांना तंबूत पाठवले आहे. त्याने एकूण १४ सामने खेळत २० विकेट्स पटकावल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ७.८१ इतका आहे.(MI vs LSG IPL 2023)

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news