Mumbai Indians Playing 11 : लखनौला मात देण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, ‘अशी’ असेल प्लेईंग 11

Mumbai Indians Playing 11 : लखनौला मात देण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, ‘अशी’ असेल प्लेईंग 11

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai Indians Playing 11 : आयपीएलचा 16 वा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. मंगळवारी (दि. 23) चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तर, आज (दि. 24) मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सशी होईल. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाला लखनौविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये तीन सामने झाले असून त्यात लखनौने बाजी मारली आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा कर्णधार रोहित या एलिमिनेटर सामन्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. चला जाणून घेऊया, मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

'ही' असू शकते सलामीची जोडी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासोबत ईशान किशन सलामीला उतरू शकतो. ईशानने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा खराब फॉर्मशी झगडत आहे. या मोसमात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. ग्रीनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 100 धावांची तुफानी इनिंग खेळून संघाला प्लेऑफमध्ये पोहचवले होते. उत्कृष्ट फलंदाजीसोबतच तो उत्कृष्ट गोलंदाजीतही निष्णात खेळाडू आहे.

मिडल ऑर्डर 'अशी' राहू शकते

चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवचे मैदानात उतरणे निश्चित आहे. आयपीएल 2023 च्या सुरुवातीला सूर्या लयीत दिसत नव्हता, परंतु त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत वादळी खेळी साकारल्या. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 1 शतकासह 511 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर नेहल वढेराला तर सहाव्या क्रमांकावर टीम डेव्हिडला संधी मिळेल.

गोलंदाजीत पियुष चावलाने मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. पियुषला साथ देण्यासाठी कुमार कार्तिकेय सिंह याला संधी मिळू शकते. जेसन बेहरेनडॉर्फ, ख्रिस जॉर्डन आणि आकाश मधवाल वेगवान आक्रमणे सांभाळतील.

लखनौविरुद्ध मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Mumbai Indians Playing 11)

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, जेसन बेहरेनडॉर्फ, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, पियुष चावला, कुमार कार्तिकेय सिंह.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news