BCCI Plants 42000 Saplings : धोनीच्या सीएसकेची IPL फायनलमध्ये धडक, BCCI लावणार 42000 झाडे!

BCCI Plants 42000 Saplings : धोनीच्या सीएसकेची IPL फायनलमध्ये धडक, BCCI लावणार 42000 झाडे!

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Plants 42000 Saplings : आयपीएलच्या 16व्या हंगामातील प्लेऑफचा टप्पा सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. 23) क्वालिफायर 1 खेळवण्यात आला. तर एलिमिनेटर सामना आज, बुधवारी (दि. 24) खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (CSK vs GT Qualifier 1) 15 धावांनी पराभव करत 10व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. सात गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्यानंतर सीएसके गुजरात टायटन्सला 20 षटकांत 157 धावांत गुंडाळले.

दरम्यान, या सामन्यापासून बीसीसीआयने मोठा बदल केल्याचे समोर आले. प्रेक्षकांना स्कोअर बोर्डवर डॉट बॉलच्या जागी झाड दिसत होते. झाडे दाखवण्याचा नेमका काय अर्थ आहे? हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडला. याबाबत माहिती घेतली असता समजते की, बीसीसीआय आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी झाडे लावणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील प्ले ऑफच्या सामन्यातील प्रत्येक डॉट बॉलसाठी टाटा समूह आणि बीसीसीआय 500 झाडे लावणार आहेत.

क्वालिफायर-1 मध्ये 84 डॉट बॉल (BCCI Plants 42000 Saplings)

सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यात गोलंदाजांनी एकूण 84 डॉट बॉल टाकले. आता त्यामुळे या एका सामन्यातील डॉट बॉलनुसार बीसीसीआय यापुढे एकूण 42,000 झाडे लावणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या रवींद्र जडेजाने सामन्यात सर्वाधिक 12 डॉट बॉल टाकले. तर तुषार देशपांडेचे 11 चेंडू डॉट होते.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. जय शाह यांनी ट्विट केले की, 'आयपीएल प्लेऑफमध्ये प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्यात टाटा समूहासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. क्वालिफायर 1 मध्ये जीटी विरुद्ध सीएसकेला 84 डॉट बॉल्स पडल्यामुळे 42,000 झाडे मिळाली. कोण म्हणतो टी-20 हा फलंदाज खेळ आहे? हा खेळ गोलंदाजांसाठीही आहे आणि ते तुमच्या हातात आहे.'

चेन्नई अंतिम फेरीत

ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर धोनीच्य सीएसकेने मंगळवारी आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवून दणक्यात अंतिम फेरीत धडक मारली. धोनीचा संघ आता पाचव्यांदा विजेतेपद पटकावतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गायकवाडच्या 44 चेंडूतील 60 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा 157 धावांचा डाव समाविष्ट करून सात विकेट्सवर 172 धावा केल्या आणि 10व्यांदा अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

हार्दिकचा गुजरात संघ आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी भिडणार आहे. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले. रशीद खानने शेवटच्या षटकात 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी करत सामन्यात चुरस वाढवली. पण तो बाद झाल्यानंतर सीएसके आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news