INDvsAUS : टीम इंडियाने कांगारुंना गार करत पाकला भरवली धडकी

INDvsAUS : टीम इंडियाने कांगारुंना गार करत पाकला भरवली धडकी
Published on
Updated on

टी २० वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया ( INDvsAUS ) यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या  सामन्याआधी टीम इंडियाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांना मात देत चांगला सराव केला. या कामगिरीद्वारे भारताने पाकिस्तानवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १५३ धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान भारताने १८ षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यातच पार केले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावा ठोकल्या. तर केएल राहुलने ३९ तर सूर्यकुमार यादवने ३८ धावा करत फलंदाजीचा चांगला सराव केला. शेवटी रोहित शर्मा निवृत्त झाला आणि त्याच्या जागी आलेल्या हार्दिक पांड्याने ८ चेंडूत १४ धावा करत फलंदाजीचा सराव करण्याचा प्रयत्न केला.

टी २० वर्ल्डकपमधील दुसरा सराव सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया ( INDvsAUS ) यांच्यात दुबई येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व पाच आयपीएल टायटल नावावर असलेल्या रोहित शर्माकडे सोवपण्यात आले आहे. विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अॅरोन फिंच करत आहे. त्याने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर सर्वांची नजर होती. मात्र अश्विनच्या गोलंदाजीवर तो ७ चेंडूत १ धाव करुन माघारी परतला. त्या पाठोपाठ अश्विनने पुढच्याच चेेंडूवर मायकल मार्शलाही तंबूत पाठवले. अश्विनने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेतल्याने त्याला पुढच्या षटकात हॅट्ट्रिकची संधी आहे.

फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया अडकली ( INDvsAUS )

अश्विन पाठोपाठ रोहित शर्माने आपला दुसरा फिरकीपटू रविंद्र जडेजालाही पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यास पाचारण केले. चौथे षटक टाकण्यासाठी आलेल्या जडेजाने पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला पायचीत बाद केले. यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ षटकात ३ बाद १४ धावा अशी झाली.

यानंतर आयपीएल गाजवणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. मॅक्सवेल आक्रमक शैलीत फलंदाजी करत होता. मात्र ही जोडी राहुल चाहरने १२ व्या षटकात फोडली. त्याने मॅक्सवेलला ३७ धावांवर बाद केले. संघाच्या ७२ धावा झाल्या असताना मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला शतक पार करुन दिले.

दरम्यान, स्मिथने आपली धावगती वाढवली. त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या जोडीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसनेही स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक फटके मारत ऑस्ट्रेलियाला १५० च्या जवळ आणून ठेवले. अखेर भुवनेश्वरने ही जोडी फोडली. त्याने स्मिथला ५७ धावांवर बाद केले. स्मिथ बाद झाल्यानंतर सामन्याचा अखेरचा चेंडू शिल्लक होता. त्यावर मॅथ्यू वेडने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला २० षटकात ५ बाद १५२ धावांवपर्यंत पोहचवले.

INDvsAUS : सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे लक्ष

याचबरोबर भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमार यादवही सुपर १२ फेरी सुरु होण्यापूर्वी धावा करुन आपला आत्मविश्वास दुणावण्याचा नक्की प्रयत्न करेल. याचबरोबर आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला दुखापतीमुळे आपला पदार्पणाचा ऑस्ट्रेलिया दौरा करता आला नव्हता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news