MI vs SRH : मुंबई जिंकली; पण ‘प्ले-ऑफ’चे टेन्‍शन कायम | पुढारी

MI vs SRH : मुंबई जिंकली; पण 'प्ले-ऑफ'चे टेन्‍शन कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅमरन ग्रीन दमदार शतक  आणि आकाश मधवालच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला.  मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्‍या सामन्‍यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला हाेता. सनरायझर्सने दिलेले २०१ धावांचे लक्ष्‍य मुंबईने केवळ १८ षटकांमध्‍येच पूर्ण केले. (MI vs SRH) दरम्‍यान, मुंबईने हा सामना जिंकला असला तरी ‘प्ले-ऑफ’ स्‍थान मिळविण्‍याचे टेन्‍शन कायम आहे. आता आज हाेणार्‍या आरसीबी विरुद्‍ध गुजरात सामन्‍याकडे मुंबईचे लक्ष असणार आहे. या सामन्‍यात आरसीबीचा पराभव झाल्‍यास मुंबई चाैथ्‍या स्‍थानावर धडक मारेल.

दरम्यान, मुंबईने सनरायझर्सच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला. मुंबईच्या या विजयाने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम आहेत. यानंतर मुंबईचे लक्ष आरसीबी विरुद्ध गुजरात या सामन्याकडे असणार आहे. मुंबईकडून रोहित शर्माने ३७ चेंडूमध्ये ५६ धावा, इशान किशन १२ चेंडूमध्ये १४ धावा, सूर्यकुमार यादव १५ चेंडूमध्ये २४ धावा आणि कॅमरन ग्रीनने ४७ चेंडूमध्ये १०० धावांचे योगदान दिले.  हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १ तर मयांक डगरने १ विकेट पटकावली. (MI vs SRH)

तत्पूर्वी, विव्रांत शर्मा आणि मयांक अग्रवालने पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी रचली. सनरायझर्स हैदराबादकडून विव्रांत शर्माने ४७ चेंडूमध्ये ६९ धावा, मयांक अग्रवाल ४६ चेंडूमध्ये ८३ धावा आणि हेनरिख क्लासीनने १३ चेंडूमध्ये १८ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने ४ तर क्रिस जॉर्डनने १ विकेट पटकावली. (MI vs SRH)

हेही वाचलंत का?

Back to top button