T20 world cup : आयरलँडच्या ‘या’ पठ्ठ्याने घेतल्या चार चेंडूत सलग चार विकेट

T20 world cup : आयरलँडच्या ‘या’ पठ्ठ्याने घेतल्या चार चेंडूत सलग चार विकेट

टी-२० वर्ल्ड कपच्या ( T20 world cup ) थरारास १७ ऑक्टोंबर पासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशीच्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात आयरलँडचा गोलंदाज कर्टिस कॅम्फर याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. कर्टिस कॅम्फरने नेदरलँड विरुद्ध हॅट्ट्रिक घेत सलग चार चेंडूत चार फलंदाज बाद करत ऐतिहासिक कामगिरी बजावली. तसेच अशी कामगिरी करणारा तो आयरलँडचा पहिलाच गोलंदाज ठरला.

आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी बजावणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापुर्वी अशी कामगिरी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा आणि अफगानिस्तानच्या राशिद खान याने बजावली आहे. राशिदने आयरलँड विरुद्ध २०१९ साली अशी कामगिरी केली. तर लसिथ मलिंगा याने २०१९ साली न्युझीलंडचे सलग चार फलंदाज बाद केले होते. तसेच टी – २० वर्ल्ड ( T20 world cup ) कपचा विचार केला तर ब्रेट ली याने बांगलादेश विरुद्ध हॅटट्रीक नोंदवली होती.

सोमवारी नीदरलँड विरुद्ध आर्यलँड ( T20 world cup ) सामना खेळवण्यात आला. नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडची सुरुवातच खराब झाली. तिसऱ्या चेंडूवरच सलामीवर बेन कुपर शुन्यावर धावबाद झाला. त्यानंतर २२ धावांवर नेदरलंडचा दुसरा फलंदाज बाद झाला. तेथून नेदरलँडने जम बसविण्याचा प्रयत्न करीत ९ षटकापर्यंत ५० धावा फलकावर लावल्या होत्या. १० वे षटक टाकण्यासाठी कर्टिस कॅम्फर याला पाचारण करण्यात आले.

कॅम्फरने आपल्या १० षटकाची सुरुवात केली. कॅम्फरने पहिला चेंडू वाईड टाकला. तेव्हा नेदरलँडच्या २ बाद ५१ अशा धावा झाल्या होत्या. कॅम्फरचा पुढील चेंडूवर नेदरलँडच्या ॲकरमनने धाव घेतली. दुसरा चेंडू कॅम्परने फलंदाजाच्या लेगसाईडला टाकला तो वाईडला जात होता, पण फलंदाज ॲकरमनने त्यास मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. गोलंदाज कॅम्फर व आयरलँडच्या खेळाडूंनी पंचांकडे अपिल केली. पण पंचांनी तो चेंडू वाईड ठरवला. आयरलँडच्या कर्णधाराने डीआरएसची अपील केली. डीआरएस मध्ये चेंडूला बॅटचा स्पर्श झाल्याचे दिसले आणि ॲकमरनला बाद ठरविण्यात आले. नेदरलँडचा डिशकाटे हा फलंदाज मैदानात उतरला. तिसऱ्या चेंडूवर कॅम्फरने डिशकाटेला पायचित कले. डिशकाटे खाते न उघडताच माघारी परतला.

डिशकाटेनंतर स्कॉट एडवर्ड हा फलंदाज मैदानात उतरला कॅम्फरने चौथ्या चेंडूवर एडवर्ड याला पायचित केले. पण पंचांनी त्यास नाबाद ठरवले. आयरलँडने पुन्हा रिव्ह्युवसाठी अपील केले. डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचे स्पष्ट झाले, अन एडवर्डला बाद ठरविण्यात आले. अशा प्रकारे कॅम्फरने आपली पहिली हॅट्ट्रिक नोंदवली.

एडवर्डनंतर वॅन डर मेर्व हा मैदानात उतरला. पाचवा चेंडू कॅम्फरने टाकला. फलंदाज वॅन डर मेर्व याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅटचा कडा घेऊन चेंडू स्टम्पवर आदळला आणि वॅन डर मर्वचा त्रिफळा उडाला. अशा प्रकारे कॅम्फरने चार चेंडूत चार बळी घेत नेदरलँडचे कंबरडेच मोडले. तीन फलंदाजांना कॅम्फरने शून्यावर बाद करत तंबुचा रस्ता दाखवला. अशी कामगिरी करणार कॅम्फर हा आयरलँडचा पहिला गोलंदाज ठरला.

आयरलंडचा कर्टिस कॅम्फर हा मध्यमगती गोलंदाज असून तो अत्यंत प्रभावी खेळाडू आहे. तो साऊथ आफ्रिकेकडून अंडर – १९ साठी क्रिकेट खेळला आहे. या २२ वर्षीय युवा गोलंदाजाने यंदाचे टी -२० वर्ल्ड कप गाजवले आहे. अगदी सुरुवातीच्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी बजावत वर्ल्ड कपच्या रौमांचात भर घातली आहे. जसजशी स्पर्धा पुढे सरकेल तसतसा हा रौमांच अधिक वाढत जाणार आहे हे निश्चित.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news