Kohinoor Diamond : ब्रिटनमधील कोहिनूर हिरा परत आणण्याची भारताची योजना | पुढारी

Kohinoor Diamond : ब्रिटनमधील कोहिनूर हिरा परत आणण्याची भारताची योजना

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनमधील संग्रहालयामधील  कोहिनूर हिरा  (Kohinoor Diamond) आणि इतर मूर्ती आणि शिल्पांसह वसाहती काळातील कलाकृतींसाठी भारत सरकारने प्रत्यावर्तन मोहिमेची योजना आखली आहे, असा दावा ‘डेली टेलीग्राफ’ या वृत्तपत्राने एका अहवालाच्या आधारे केला आहे. हा मुद्दा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि व्यापार चर्चेत हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे, असेही  यामध्‍ये म्‍हटले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभाग स्वातंत्र्यानंतर देशाबाहेर तस्करी केलेल्या वस्तूंवर (Kohinoor Diamond) पुन्हा हक्क मिळवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत असल्याचे म्हटले जात आहे. नवी दिल्लीतील अधिकारी ब्रिटनमधील संबंधित लोकांशी समन्वय साधून आहेत. त्यांच्याकडे कलाकृती भारताला परत करण्याची औपचारिक विनंती करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकार्‍यांने म्हटले आहे की, अशा ऐतिहासिक कलाकृती एक मजबूत राष्ट्रीय सांस्कृतिक ओळख अधिक मजबूत करू शकतात. संस्कृती मंत्रालयाच्या सहसचिव लिली पांडेया यांनी म्हटले आहे की, प्राचीन वस्तूंचे भौतिक आणि अमूर्त मूल्य दोन्ही आहे. सांस्कृतिक वारसा, समुदाय आणि राष्ट्रीय ओळख या कलाकृतीतून होत असते.

भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी म्हटले आहे की, पुरातन वस्तू परत आणणे, हे भारताच्या धोरणनिर्मितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत सरकारसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या कलाकृती परत आणण्याच्या या प्रयत्नाचा जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेतून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी  याला प्रमुख प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा 

Back to top button