

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगची शेवटच्या षटकांमधील फटकेबाजी आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जवर ५ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. सुरुवातील नाणेफेक जिंकत पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबने केकेआरसमोर १८० धावांचे आव्हान ठेवले होते. नितेश राणाची अर्धशतकी खेळी आणि रसेल-रिंकूने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने पंजाब किंग्जने दिलेले आव्हान शेवटच्या चेंडूवर गाठले. (KKR vs PBKS)
शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रिंकू सिंगने चौकार लगावत सामना खेचून आणला. केकेआरकडून नितेश राणा ३८ चेंडूमध्ये ५१ धावा, जेसन रॉय २४ चेंडूमध्ये ३८ धावा, आंद्रे रसेल २३ चेंडूमध्ये ४२ धावा, रिंकू सिंग १० चेंडूमध्ये २१ धावा आणि गुरबाने १२ चेंडूमध्ये १५ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून राहुल चहरने २ तर नेथन इलिस आणि हरप्रीत बरारने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (KKR vs PBKS)
तत्पूर्वी, शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि पंजाब किंग्जच्या फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पंजाबला १७९ धावांचा टप्पा गाठता आला. पंजाब किंग्जकडून ४७ चेंडूमध्ये ५७ धावा, जितेश शर्मा १८ चेंडूमध्ये २१ धावा, लिवम लिविंगस्टोन ९ चेंडूमध्ये १५ धावा, प्रभसिमरन सिंग ८ चेंडूमध्ये १२ धावा आणि रिषी धवनने ११ चेंडूमध्ये १९ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने ३, हर्षित राणाने २ तर सुयश शर्मा आणि नितीश राणाने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (KKR vs PBKS)
पंजाब किंग्जचा संघ – प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे लिवम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शारुख खान, हरप्रीत बरार, रिषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग (KKR vs PBKS)
केकेआरचा संघ – रेहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुय़श शर्मा, वरुण चक्रवर्ती (KKR vs PBKS)