Sakshi Dhoni : एम. एस. धोनीची पत्नी साक्षी प्रेग्नेंट?, बेबी बंपचे फोटो व्हायरल.. | पुढारी

Sakshi Dhoni : एम. एस. धोनीची पत्नी साक्षी प्रेग्नेंट?, बेबी बंपचे फोटो व्हायरल..

दुबई; पुढारी ऑनलाईन : sakshi dhoni : चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) शुक्रवार दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला. CSK ने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. CSK चे चाहते आपल्या आवडत्या संघाचा विजयोत्सव साजरा करत असतानाच एक वेगळे वृत समोर आले आहे. हे वृत्त वेगळे अशासाठी आहे की ते CSK कर्णधार एम एस धोनी याच्या खासगी आयुष्यासंदर्भात आहे. चला तर पाहुया काय आहे ते’ वृत्त….

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावल्यानंतर चर्चेत आहे. त्यातच चेन्नईला चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी पुन्हा वडील होणार असल्याचे वृत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंतिम सामन्यानंतर अचानक त्याची पत्नी साक्षी धोनीच्या प्रेग्नंट असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. धोनीची पत्नी साक्षीची ( sakshi dhoni ) काही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये साक्षीचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा काही चाहत्यांनी केला आहे.

धोनी किंवा साक्षीने याबाबत अद्याप काहीही जाहीर केलेले नाही. मात्र, क्रिकेट वेबसाइट क्रिकट्रॅकरसह इतर मीडिया रिपोर्टनुसार, साक्षी धोनी ( sakshi dhoni ) 4 महिन्यांची प्रेग्नंट आहे. म्हणजेच, एमएस धोनी दुसऱ्यांदा पिता होणार आहे. CSK चा क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका यांनी याची पुष्टी केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. काही चाहत्यांच्या म्हणण्यानुसार क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिने सांगितलंय की साक्षी गर्भवती आहे आणि 2022 मध्ये तिच्या घरी एक नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे हे वृत्त समोर आल्यापासून साक्षी आणि एम एस धोनीचे सोशल मीडियावर खूप अभिनंदन होत आहे.

पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा यांची CSK च्या सर्व सामन्यांना हजेरी

आयपीएल 2021 च्या हंगामात धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा यांनी सीएसकेच्या सर्व सामन्यांना हजेरी लावली. अंतिम सामन्यात चेन्नईच्या विजयानंतर दोघीही मैदानावर आल्या. या दरम्यान, चेन्नईच्या इतर अनेक क्रिकेटर्सच्या कुटुंबियांनी मैदानात उपस्थिती दर्शवली.

जिवाचा जन्म 2015 मध्ये झाला…

साक्षी धोनी मूळची उत्तराखंडमधील डेहराडूनची रहिवासी आहे. 2010 मध्ये तिने भारतीय क्रिकेट संघाचा स्टार एमएस धोनीशी लग्न केले होते. यानंतर साक्षीने 2015 मध्ये मुलगी जिवाला जन्म दिला. जिवा सध्या 6 वर्षांची आहे.

जिवाचा जन्म झाला तेव्हा एम एस धोनी 2015 साली ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील संघाचा कर्णधार होता. त्यामुळे जिवाच्या जन्मावेळी साक्षीसोबत उपस्थित नव्हता. त्याने सुमारे तीन महिन्यांनी मुलगी जिवाला पाहिले. IPL 2021 च्या अंतिम सामन्यादरम्यान, मुलगी जिवा देखील तिच्या पालकांसह विजय साजरा करताना दिसली. चेन्नईच्या विजयानंतर प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या धोनीची पत्नी साक्षी आणि त्यांची मुलगी जिवा यांनी मैदानात जाऊन धोनीला मिठी मारली. हा धोनीच्या फॅमिलीचा परफेक्ट व्हिडिओ असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याचवेळी, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये साक्षी चेन्नईच्या विजयानंतर आनंदाने नाचताना दिसली.

Back to top button