IPL 2023 : आयपीएलचा नारळ फुटला | पुढारी

IPL 2023 : आयपीएलचा नारळ फुटला

अहमदाबाद, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023)16 वा हंगाम दणक्यात सुरू करण्यासाठी बीसीसीआयने कोणतीही कसर ठेवलेली नाही. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच कोणतेही निर्बंध न लावता आयपीएल पूर्वीच्या रूपात चाहत्यांसमोर येत आहे.

यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात करण्यासाठी उद्घाटन सोहळ्याला भारतातील प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया यांची उपस्थिती होती. या सर्व स्टार्सनी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी आपली कला सादर करत चाहत्यांचे मनोरंजन केले. महिला प्रीमियर लीगप्रमाणे आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात देखील प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटर मंदिरा बेदीने आपल्या ‘केम छो’ या ओपनिंग रिमार्कने केली. (IPL 2023)

त्यानंतर प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने ‘ए वतन वतन’, ‘झुमे जो पठाण’, ‘ओम नम: शिवाय’ अशा प्रसिद्ध गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अरिजितनंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे बहारदार नृत्य झाले. रश्मिका मंदाना हिने ‘सामे’ हे तिचे सिग्नेचर साँग सादर करून उपस्थित प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. याशिवाय तिने नाटू-नाटू गाण्यावरही डान्स केला.

Back to top button