IPL 2023 : प्रायोजकांची आयपीएल स्पर्धेकडे पाठ

IPL 2023 : प्रायोजकांची आयपीएल स्पर्धेकडे पाठ
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : भारतात आयपीएलच्या क्रिकेट उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चपासून आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे, पण मागील इंडियन प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये प्रमुख प्रायोजक आणि जाहिरातदार राहिलेल्या ग्राहक इंटरनेट क्षेत्रातील अनेक कंपन्या यातून बाहेर पडल्या आहेत.

जागतिक आर्थिक मंदीच्या परिस्थितीमुळे या कंपन्यांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. यामध्ये बायजू'ज, अनअकॅडमी, फोन पे, अ‍ॅमेझॉन प्राईम, प्रिस्टेन केयर, झेप्टो, अथर एनर्जी, नियो, स्पुटीफी या कंपन्यांचा समावेश आहे. यातील सर्व कंपन्या या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत.

व्हेंचर इंटेलिजन्स डेटा दर्शवितो की भारतीय स्टार्ट अप्समधील निधी 2022 मध्ये 35.5 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 23.9 बिलियन डॉलरवर आला आहे, अग्रगण्य स्टार्टअप कंपन्यांनी त्यांच्या खर्चामध्ये मोठी कपात केली आहे. इंडिया व्हेंचर कॅपिटल्स रिपोर्ट (आयव्हीसीआर) आणि ईवाय या उद्योग समूहाच्या अहवालानुसार एप्रिल 2022 मध्ये, स्टार्टअप्समधील फंडांची गुंतवणूक 27 टक्केने घसरून 1.6 अब्ज डॉलर झाली आहे.

आयपीएल 2022 मध्ये स्टार्टअप्स वाढ झाली होती, ज्यामध्ये 60 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला होता. स्टार स्पोर्टस् या अधिकृत प्रसारकांनी 14 प्रायोजक मिळवले होते, त्यापैकी आठ स्टार्टअप्स होते. क्रेड, फोन पे, स्पुटीफी, स्विगी, इन्स्टामार्ट आणि मेशो हे सहयोगी प्रायोजक होते, तर ड्रीम 11, टाटा नेउ आणि बायजू'ज सह-प्रस्तुत प्रायोजक होते. (IPL 2023)

त्याचप्रमाणे, डिझ्ने प्लस हॉटस्टारवरील 18 पैकी 12 जाहिरातदार स्टार्टअप होते, ज्यात ड्रीम11, टाटा नेउ, झेप्टो, क्रेड, स्पीनी, प्रिस्टेन केयर, स्विगी, रु पे, अथर, लिवपेस, नियॉक्स आणि स्पुटीफी यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त, 40 हून अधिक स्टार्टअप विविध संघांना निधी पुरवत होते. आयपीएल 2022 हा खर्‍या अर्थाने स्टार्टअप्ससाठी उत्सव बनला होता. मेशो आणि कार 24 या कंपन्यांनी हंगामातून माघार घेतली आहे. मात्र अथर एनर्जी कंपनी गुजरात टायटन्ससोबतची भागीदारी सुरू ठेवणार आहे.

अधिकृत आयपीएल भागीदार म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) करार केलेल्या नवीन कंपन्यांमध्ये यांचा समावेश आहे.

कोव्हिड-19 च्या अलीकडच्या वर्षांत आयपीएलवरही परिणाम झाला होता, ज्यामुळे स्पर्धा उशिरा झाली किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सामने हलवले गेले. या वर्षी जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आयपीएलवरही दिसून येत आहे. त्यामुळे आयपीएलचे प्रायोजकत्व आणि जाहिरातींसाठी कंपन्यांचा उत्साह आणखी कमी झाला आहे. तरीसुद्धा या स्पर्धेने अजूनही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित करणे आणि बीसीसीआय आणि त्याच्या भागीदारांसाठी लक्षणीय कमाई करणे अपेक्षित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news