जम्मू काश्मीरची स्पीडगन उमरान मलिकवर लक्ष ठेवलायला हवे : विराट | पुढारी

जम्मू काश्मीरची स्पीडगन उमरान मलिकवर लक्ष ठेवलायला हवे : विराट

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२१ ची साखळी फेरी आता समाप्तीकडे सरकली आहे. याच दरम्यान जम्मू काश्मीरची स्पीडगन उमरान मलिकची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. सनरायझर्सचा नेट बॉलर म्हणून युएईमध्ये गेलेल्या उमरान मलिकला टी. नटराजन कोरोनाग्रस्त झाल्याने संघात स्थान मिळाले आणि त्याने आपल्या वेगाने सर्वांनाच वेडे केले. रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध त्याने पुन्हा वेगवान मारा करत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे लक्ष वेधून घेतले.

जम्मू काश्मीरची स्पीडगन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या उमरान मलिकने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात १५२.९५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचे लोकी फर्ग्युसनचे ( १५२.७५ ) रेकॉर्ड मागे टाकले. स्पीडगन उमरान मलिकच्या या वेगवान गोलंदाजीने प्रभावित झालेल्या विराट कोहलीने ‘जम्मू काश्मीरच्या या स्पीडगन उमरान मलिकवर लक्ष ठेवायला पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया दिली.

आयपीएलमधून दर वर्षी नवे टॅलेंट ( स्पीडगन उमरान )

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ‘आयपीएलमधून दर वर्षी नवे नवे टॅलेंट बाहेर येते. १५० किमी वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहून चांगले वाटले. या खेळाडूच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’ तो पुढे म्हणाला की, वेगावान गोलंदाजीचा विभाग मजबूत असणे भारतासाठी हा एक चांगला संकेत आहे. ज्यावेळी अशा प्रकारची प्रतिभा समोर येते त्यावेळी तुमची नजर त्याच्यावर राहते. तुम्ही हा खेळाडू आपल्या क्षमतेत कशी वाढ करु शकतो हे पाहता.’

आरसीबी विरुद्धच्या सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने उमरानशी गप्पा मारल्या. त्यावेळी उमरानने सांगितले की, ‘ज्यावेळी तो आयपीएल खेळण्यासाठी आला त्यावेळी वॉर्नर, जेसन रॉय आणि केन विल्यमसन सारख्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना थोडा नर्वस होता. पण, इथे गोलंदाजी करुन जो अनुभव मिळाला त्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.’

हेही वाचा : Chennai vs Punjab : पंजाबचा भेदक मारा, सीएसके अडचणीत

स्पीडगन उमरान मलिक पहिल्या आयपीएल विकेटनंतर काय म्हणाला?

उमरानने आपल्या पहिल्या आयपीएल विकेटबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, ‘सामन्यापूर्वची मी ठरवले होते की आज कोणत्याही परिस्थीत विकेट घ्यायचीच. विकेट मिळाल्यानंतरचा आनंद मी शब्दात व्यक्तच करुन शकत नाही.’

उमरानने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केले. याच सामन्यात उमरान १५१.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत या सत्रात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज बनला होता. त्यानंतर आयपीएलच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात १५२.९५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून लोकी फर्ग्युसनचे रेकॉर्ड तोडले.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननेही उमरान मलिकच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. तो म्हणाला की, ‘उमरान खास आहे. आम्ही त्याला नेटमध्ये अशा प्रकारे वेगवान गोलंदाजी करताना पाहिले होते. त्यामुळे आम्हाला सामन्यात तो अशी कामगिरी करताना पाहून आश्चर्य वाटले नाही. तो संघासाठी फार उपयुक्त आहे.’

Back to top button