Kane Williamson : विल्यमसनला बक्षीस म्हणून मिळाला 150 लिटर पेंट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडलेल्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातो. त्यांना लाखो रुपये बक्षीस म्हणून दिले जातात पण अनेक देशांमध्ये असे होत नाही. न्यूझीलंडमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले. जिथे किवी संघाच्या केन विल्यमसनने (kane williamson) ‘प्लेअर ऑफ द सिरीज’वर आपले ननव कोरल्यानंतर त्याला खूप विचित्र बक्षीस मिळाले आहे.
विल्यमसनने (kane williamson) श्रीलंकेविरुद्ध (NZ vs SL) दोन कसोटी सामन्यांत एका द्विशतकाच्या मदतीने एकूण 337 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 168.50 च्या सरासरीने अपल्या खात्यात धावा जमा केल्या. विल्यमसनची सर्वोत्तम धावसंख्या 215 धावा होती. केनच्या या चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान किवी संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. विल्यमसनच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 51 हजारांचा धनादेश तसेच पेंट कॅन बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. रुपयांमध्ये या पेंटची किंमत सुमारे 16 हजार रुपये आहे.
16 हजार रुपयांचा पेंट
न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवरून, विल्यमसनला बक्षीस म्हणून 150 लिटर पेंट मिळाल्याचे जाहीर केले आहे. बोर्डाने म्हटले की, विल्यमसनला त्याच्या मॅच विनिंग खेळासाठी 150 लिटर पेंट बक्षीस स्वरूपात देण्यात आला आहे. या पेंटचा वापर टी पुक क्रिकेट क्लबला रंगविण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे. विल्यमसनकडून अशी भेट मिळाल्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
विल्यमसनने झळकावले 4 डावात 2 शतके, 1 द्विशतक (kane williamson)
ख्राइस्टचर्च कसोटी सामन्यात विल्यमसनने शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विल्यमसनने आपल्या शेवटच्या 4 डावांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. केनने शेवटच्या 4 डावात 2 शतके आणि एक द्विशतक झळकावले. विल्यमसन आता आयपीएलच्या 16 व्या मोसमात खेळताना दिसणार आहे. यावेळी तो सध्याच्या चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
Your Dulux Player of the Series, Kane Williamson.
– 337 runs
– 168.50 average
– 215 highest score
– 150 litres of Dulux paint for Te Puke Cricket Club. #NZvSL pic.twitter.com/fo0JaObyfb— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 20, 2023