IND vs AUS ODI : स्टार्कचा धमाका; ११७ धावांत टीम इंडियाला गुंडाळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामनाा विशाखापट्टणम येथे सुरु आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याने घेतलेल्या ५ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव अवघ्या ११७ धावांमध्ये गुंडाळला.
स्टार्कचा भेदक मारा, निम्मा संघ तंबूत पाठवला
आपल्या भेदक गोलंदाजीने मिचेल स्टार्कने दुसर्या वन-डेमध्ये पाच विकेट घेतल्या. त्याने टीम इडियाचे सलामीवीर रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्यासह सूर्यकुमार यादव, के.एल. राहूल आणि सिराजची विकेट त्याने घेतली. स्टार्कला नेथन इलियन, ॲबघीट आणि ग्रीनची साथ मिळाली. या तिघांनी अनुक्रमे 3, 2 आणि १ विकेट घेतली. केवळ विराट कोहली आणि अक्षर पटेल या दोघा फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्याला तोंड दिले. विराटने ३१ धावा केल्या. तर अक्षर २९ धावांवर नाबाद राहिला.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
सलामीवीर शुभमनसह टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना धावांचे खातेही उघडता आले नाही. भारताचे चार फलंदाज शून्यवर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर तर रवींद्र जडेजा 16 धावाकरून बाद झाला. हार्दिक पंडया एका धाव करून बाद झाला. यामध्ये भारताच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडी ही गाठता आला नाही. तसेच ११७ ही भारताची तिसरी निचांकी धावसंख्या आहे भारताचा डाव अवघ्या ११७ धावांवर संपुष्टात आली. आता वन-डे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ११८ धावांची गरज आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
विशाखापट्टणम येथे तीन वर्षांनंतर सामना
या मैदानावर भारतीय संघाचे रेकॉर्ड खूप चांगले आहे. मुंबईत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला घाम फुटला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2-0 अशा फरकाने मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तीन वर्षांनंतर विशाखापट्टणममध्ये सामना खेळवला जात आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागलेली आहे. सर्व तिकिटे विकली गेली आहेत पण हवामानामुळे या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.