INDvsAUS ODI Series : कसोटीनंतर वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला धक्का, संघाचा कर्णधार बदलला

INDvsAUS ODI Series : कसोटीनंतर वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला धक्का, संघाचा कर्णधार बदलला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsAUS ODI Series : कसोटी मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये 17 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या आगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स (pat cummins) उपलब्ध होणार नसून त्याच्या जागी पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ (steve smith) हाच संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी ही माहिती दिली.

कमिन्सच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड नाहीच

कमिन्स (pat cummins) आईच्या आजारपणामुळे दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर दौरा अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियाला परतला होता. यानंतर त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तो वनडे मालिकेसाठी भारतात परतणार नाही. त्यामुळे स्मिथ हाच हंगामी कर्णधार असेल असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे, असेही मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन संघात कमिन्सच्या जागी पर्यायी खेळाडूची अद्याप निवड करण्यात आलेली नाही. (INDvsAUS ODI Series)

स्मिथसाठी वनडे मालिका महत्त्वाची (steve smith)

आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्धची वनडे मालिका ऑस्ट्रेलियासाठे अत्यंत महत्त्वाची आहे. स्मिथने 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 25 सामने जिंकले असून 23 सामने गमावले आहेत. त्याने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात अखेरच्यावेळी संघाचे नेतृत्व केले होते. 2017 हे शेवटचे वर्ष होते जेव्हा स्मिथने भारतात वनडे मालिकेचे नेतृत्व केले होते. त्या मालिकेत टीम इंडियाने स्मिथच्या संघाला 4-1 ने धुळ चारली होती. (INDvsAUS ODI Series)

गेल्या काही वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने प्लेईंग इएव्हनमध्ये अष्टपैलू खेळाडूंवर भर दिला आहे. यामुळे आठव्या क्रमांकावर कॅमेरून ग्रीन किंवा ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला येतात. संघाच्या संतुलनाबाबत प्रशिक्षक मॅकडोनाल्ड म्हणाले, 'आम्ही वनडे सामन्यातील संघ रचनेबद्दल आमची चर्चा झाली आहे. आम्ही आठ फलंदाजांसह मैदानात उतरतो. जेणेकरून आमची फलंदाजी भक्कम असते. संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंची निवड करण्यात आली आहे आणि ते सर्व प्लेईंग इलेव्हनचा भाग असू शकतात,' असा खुलासा त्यांनी केला.

स्मिथचा अनोखा विक्रम (steve smith)

मुंबईत ऑस्ट्रेलियन संघाची सूत्रे हाती घेताच स्मिथ मागील पाच सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवणारा चौथा खेळाडू ठरणार आहे. अॅरॉन फिंचने सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर कमिन्सला वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती आणि जोश हेझलवूडने संघाचे नेतृत्व केले होते. अशा स्थितीत अॅरॉन फिंच, पॅट कमिन्स (pat cummins) आणि जोश हेझलवूड यांनी गेल्या चार सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे.

अनेक खेळाडूंचे कांगारू संघात पुनरागमन

पायाची दुखापतीतून सावरल्यानंतर मॅक्सवेल संघात परतला आहे. पण तो तिन्ही वनडे सामन्यांमध्ये खेळणार की त्याला विश्रांती दिली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे कोपर फ्रॅक्चर झाल्याने दिल्ली कसोटीनंतर बॉर्डर-गावसकर मालिकेतून बाहेर पडलेला डेव्हिड वॉर्नरही तंदुरुस्त झाला असून त्याचेही संघात पुनरागमन झाले आहे. टाचेवर शस्त्रक्रिया करून पुनरागमन करणारा मिचेल मार्शही संघात उपयुक्त भूमिका बजावू शकतो. कसोटी मालिकेदरम्यान मायदेशी परतलेला अॅश्टन ॲगर हाही वनडे संघात परत अला आहे. त्याने अलीकडेच मार्श कपच्या फायनलमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी 64 धावांत पाच बळी घेतले. अॅडम झाम्पासोबत तो फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करेल. (INDvsAUS ODI Series)

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ :

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅश्टन ॲगर, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा जोश इंग्लिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news