INDvsAUS 4th Test : उस्मान ख्वाजाचे शतक, कॅमरून ग्रीन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर | पुढारी

INDvsAUS 4th Test : उस्मान ख्वाजाचे शतक, कॅमरून ग्रीन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आजपासून (दि.9) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 90 षटकांत 4 बाद 255 आहे.

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

पीटर हँड्सकॉम्बच्या रुपात ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याला शमीने क्लिन बोल्ड केले. हँड्सकॉम्ब 27 चेंडूत 17 धावा केल्या. यावेळी कांगारूंची धावसंख्या 70.4 षटकात 170 होती.

स्मिथ क्लिन बोल्ड

151 धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला. जडेजाने स्मिथला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून त्याला क्लिन बोल्ड केले. स्मिथने 135 चेंडू खेळून 38 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 150 धावांच्या पुढे

अहमदाबाद कसोटीत पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने दोन गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा ही जोडी सध्या क्रीजवर आहे. दोघांमध्ये उत्कृष्ट भागीदारी झाली असून ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. ख्वाजाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथही आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

दुसऱ्या सत्राचा खेळ संपला

पहिल्या दिवशीचा दुसऱ्या सत्राचा खेळ संपला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 149 होती. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. या दोघांसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसले. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताला एकही बळी मिळवण्यात यश आले नाही.

उस्मान ख्वाजाचे अर्धशतक

उस्मान ख्वाजाने 146 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी सुद्धा पूर्ण केली. याआधी त्याने ट्रॅव्हिस हेडसोबतही अर्धशतकी भागीदारी केली होती. ख्वाजाचे हे कसोटी क्रिकेटमधील 22 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गडी गमावून 130 धावांच्या पुढे गेली.

उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गडी गमावून 75

पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 75 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 43 व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 गडी गमावून 107 धावा होती.

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

72 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. 22 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत मार्नस लबुशेन 20 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. शमीने त्याला बोल्ड केले. मार्नस चांगल्या स्पर्शात दिसत होता, परंतु शमीकडून एक आतील चेंडू खेळण्यात चूक झाली आणि चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठावर गेला आणि स्टंपला लागला. आता उस्मान ख्वाजासोबत कर्णधार स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहे.

ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट

ऑस्ट्रेलिया संघाची पहिली विकेट 61 धावांवर पडली. ट्रॅव्हिस हेड 44 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. रविचंद्रन अश्विनने 15 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला रवींद्र जडेजा करवी झेलबाद केले. हेड फाईन टचमध्ये दिसत होता, पण खराब शॉट खेळून तो बाद झाला.

शेवटचा सामना जिंकणाऱ्या कांगारू संघ कोणताही बदल न करता या सामन्यात उतरला. भारतीय संघात मात्र एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर असून हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेषत: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही लढत टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. ऑस्ट्रेलियन संघ आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा सामना अनिर्णीत राहिला, तरच श्रीलंकेचा पराभव किंवा न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णीत राहणे टीम इंडियाला पुढे नेऊ शकेल.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, टॉड मर्फी, नॅथन लियॉन

Back to top button