England ODI : वन-डे क्रिकेटमध्‍ये ‘या’ खेळाडूने पदार्पणातच रचला इतिहास | पुढारी

England ODI : वन-डे क्रिकेटमध्‍ये 'या' खेळाडूने पदार्पणातच रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा क्रिकेटपटू रेहान अहमद याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणातच इतिहास रचला आहे. त्याला बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्‍ये खेळण्याची संधी मिळाली. रेहान इंग्लंडकडून वन-डेमध्ये पदार्पण करणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे. त्याने २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. (England ODI)

इंग्लंडसाठी वन-डे क्रिकेटमध्‍ये सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्‍याचा विक्रम बेन होलिओक याच्या नावावर होता. होलिओक याने १९९७ मध्ये लॉर्ड्स येथे खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे सामन्यात पदार्पण केले होते.  तेव्हा त्याचे वय २० वर्षे २१ दिवस एवढे होते. आता रेहान याने  १८ वर्षे २०५ दिवसांचा असताना इंग्‍लंडसाठी पहिला वन-डे आंतरराष्‍ट्रीय सामना खेळला आहे. इंग्‍लंडसाठी सर्वात कमी वयाचा खेळाडू म्‍हणून तिसऱ्या क्रमांकावर सॅम करनचे नाव आहे. त्याने २० वर्षे आणि ६७ दिवसांचा असताना वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (England ODI)

कसोटीतीलही विक्रम रेहानच्‍या नावावर

रेहान हा कसोटी क्रिकेटमध्येही  सर्वांत कमी वयात पदार्पण करणारा इंग्डंचा खेळाडू ठरला होता. त्याने १८ वर्षे आणि १२६ दिवसांचा असताना पहिला कसोटी सामना खेळला होता. जगात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्‍तानच्‍या हसन राजाच्या नावावरआहे.  १४ वर्षे २३३ दिवस एवढे वय असताना त्‍याने वन-डे सामना खेळला होता.  (England ODI)

हेही वाचंलत का?

Back to top button