IND vs AUS 4th Test : चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात ‘हे’ मोठे बदल होण्याची शक्यता

IND vs AUS 4th Test : चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात ‘हे’ मोठे बदल होण्याची शक्यता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. इंदूर येथील तिसर्‍या कसोटीत टीम इंडियाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला. आता डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी टीम इंडियाला चौथी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या स्टार खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवेल असा अंदाज आहे.

'ही' असू शकते सलामीची जोडी

तिसऱ्या कसोटीत केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली. पण तो फलंदाजीत अयशस्वी ठरला. असे असूनही चौथ्या कसोटीत त्याला संघातील स्थान पक्के करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. तो कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरू शकतो. चेतेश्वर पुजाराचे तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. पुजाराने इंदूर कसोटीत 59 धावांची इनिंग खेळली होती.

अशी असू शकते मिडल ऑर्डर

भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली अद्याप आपल्या लयीत दिसलेला नाही. त्याची सुरुवात चांगली होत असली तरी त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आलेले नाही. त्याचवेळी तिसऱ्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरचे कौतुक केले. तो म्हणाला की, फिरकीच्या ट्रॅकवर तुम्हाला अय्यरसारखी फलंदाजी करण्याची गरज आहे. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये असेल यात शंका नाही. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 26 धावा केल्या.

युवा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. अशा स्थितीत चौथ्या कसोटीत त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.

'या' गोलंदाजांना मिळेल स्थान

भारतीय फिरकी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना खेळवणे निश्चित दिसते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या कसोटीत वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती, मात्र चौथ्या कसोटीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो आणि उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मोहम्मद सिराजला संघात साथ देण्याची संधी मिळू शकते.

चौथ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news