Women’s Premier League 2023 : डब्ल्यूपीएलच्या बोधचिन्हाचे अनावरण | पुढारी

Women's Premier League 2023 : डब्ल्यूपीएलच्या बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, वृत्तसंस्था : वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या हंगामाचा नारळ 4 मार्चला मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर फुटणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज डब्ल्यूपीएलच्या अधिकृत बोधचिन्ह शक्तीचे अनावरण केले. याबाबतचा व्हिडिओ जय शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. शक्ती ही एक निळ्या जर्सीतील वाघीण आहे.

वुमन्स प्रीमियर लीग च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स या पाच संघाचा समावेश आहे. पहिल्या हंगामाच्या लिलावात सर्व पाच संघांनी भारतातील युवा महिला क्रिकेटपटू आणि गुणवान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा योग्य समतोल राखला आहे.

डब्ल्यूपीएलचा पहिला सामना हा 4 मार्च रोजी डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना हा अंबानी विरूद्ध अदानी असाही असणार आहे. कारण गुजरात जायंट्सच्या संघाची मालकी ही अदानींकडे आहे. डबल्यूपीएलमध्ये 20 लीग सामने आणि दोन प्ले ऑफचे सामने होणार आहेत. ही स्पर्धा 23 दिवस चालणार आहे.

Back to top button