Harry Brook : 9 डाव, 100 सरासरी, 99.38 स्ट्राईक रेट… ब्रूकने बदलला इंग्लंड कसोटी संघाचा चेहरा

Harry Brook : 9 डाव, 100 सरासरी, 99.38 स्ट्राईक रेट… ब्रूकने बदलला इंग्लंड कसोटी संघाचा चेहरा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड फलंदाजांनी बेजबॉल रणनीतीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा बँड वाजवला आहे. इंग्लिश कसोटी क्रिकेटमधील या नव्या आक्रमणात हॅरी ब्रूकने (Harry Brook) विशेष योगदान दिले आहे. त्याची धडाकेबाज आकडेवारीही याची साक्ष देत आहेत.

बेन स्टोक्स (Ben Stokes) कर्णधार आणि ब्रेंडन मॅक्युलम (Brendon Mccullum) मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेटकडे (England Test Cricket) पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एकापाठोपाठ एक कसोटी मालिका गमावल्या. तर स्टोक्सने नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यानंतर संघ एका वेगळ्याच पातळीवर कसोटी क्रिकेट खेळत आहे.

24 वर्षीय हॅरी ब्रुक (Harry Brook) या इंग्लिश क्रिकेटपटूने आतापर्यंत केवळ सहा कसोटी सामने खेळले आहेत. मजबूत स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला असून इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 65 षटकांत 3 बाद 315 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवशी 90 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. हॅरी ब्रूक 169 चेंडूत 184 धावा करून नाबाद परतला.

हॅरी ब्रूकने (Harry Brook) सहा कसोटीच्या नऊ डावांत 100.88 च्या सरासरीने आणि 99.38 च्या स्ट्राईक रेटने एकूण 807 कसोटी धावा केल्या आहेत. ब्रूकच्या नावावर चार शतके आणि तीन अर्धशतके नोंदवली गेली असून केवळ नऊ डावात त्याने 20 षटकार खेचले आहेत. एवढेच नाही तर ब्रूकने कसोटी क्रिकेटमधील पहिल्या नऊ डावांत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीचा विश्वविक्रमही मोडीत काढला आहे. कांबळीने पहिल्या नऊ कसोटी डावांमध्ये 798 धावा केल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news