कोर्‍या पाटीसह नव्याने खेळास सुरुवात : इगा स्विआटेक | पुढारी

कोर्‍या पाटीसह नव्याने खेळास सुरुवात : इगा स्विआटेक

फ्रेंच ओपन, अमेरिका ओपन तसेच दोहा टेनिस विजेती अव्वल खेळाडू इगा स्विआटेकने दुबई टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मोठ्या धडाक्याने प्रवेश केला. प्रतिस्पर्धी करोलीना प्लिस्कोवाने विषाणू संसर्गामुळे स्पर्धेतून माघार घेतली.

इगाने क्रीडा समीक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. ती म्हणाली, मी खेळात अधिक भक्कमपणा आणून प्रत्येक गुणावर लक्ष केंद्रित करत आहे. वर्षाच्या सुरुवातीस, ऑस्ट्रेलियात अव्वल मानांकनाचे प्रचंड दडपण होते. त्यामुळे मानसिक चलबिचल होत होती. आता यावर मात करून मी अगदी ताजातवाना नवा अध्याय सुरू करीत आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन विजेती अर्यांना साबलेंका आपल्या विजयानंतर म्हणाली, जेलेनने पहिल्या सेटमध्ये अविश्वसनीय खेळ केला. मी हतबल होते; परंतु नंतर मी बाजू पलटविण्यात यशस्वी झाले. जोरदार खेळ करून विजयी झाल्याचा अर्थातच आनंद आहे. यशस्वी घोडदौड अशीच चालू ठवण्याचा प्रयत्न करेन.

संबंधित बातम्या

दुबई टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यासाठी अर्यांना सबालेंकाला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी बार्बोरा क्रेजिकोवाला नमवावे लागेल. तर मेडिसन कीजला कोको गॉफ शी दोन हात करावे लागतील. तसेच जेसीका पेगुला विरुद्ध मुचोवा अशी दुसरी लढत होईल.

दुबईत सध्या आल्हाददायक हवामान आहे दुपारी फार कडक उष्णता भासत नाही. सायंकाळी थंडी जाणवते. खेळाला पोषक वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Back to top button