Aiden Markram SRH Captain : सनरायझर्स हैदराबादला मिळाला कर्णधार! ‘या’ खेळाडूकडे नेतृत्व | पुढारी

Aiden Markram SRH Captain : सनरायझर्स हैदराबादला मिळाला कर्णधार! ‘या’ खेळाडूकडे नेतृत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : Aiden Markram SRH Captain : आयपीएल 2023 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 31 मार्चपासून जगातिल सर्वात मोठ्या क्रिकेट लिग स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आपल्या संघाच्या कर्णधाराची गुरुवारी घोषणा केली. द. आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) हा यंदाच्या आयपीएलसाठी सनरायझर्सचे नेतृत्व करणार आहे.

फ्रँचायझीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘प्रतीक्षा संपली आहे. आपला नवीन कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याला नमस्कार करा.’ कर्णधारपदाच्या शर्यतीत मयंक अग्रवाल आणि भुवनेश्वर कुमार यांचेही नाव होते, पण मार्करामने बाजी मारली.

मार्कराम हा नुकत्याच संपलेल्या एसए 20 (साऊतथ आफ्रिका 20)च्या पहिल्याच हंगामात सनरायजर्स इस्टर्न केप संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने जेतेपदही पटकावले. त्याच्या या यशाची दखल आयपीएलमधील सनरायझर्स हैदरबादने घेतली असून अगामी आयपीएल स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल असा संघ व्यवस्थापनाला विश्वास असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. एसए 20 च्या फायनलमध्ये मार्करामने 17 धावांत 1 बळी घेतला आणि 19 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. तर एकूण लीगमध्ये त्याने 12 सामन्यांमध्ये 33.27 च्या सरासरीने आणि 127.97 च्या स्ट्राइक रेटने 366 धावा फटकावल्या. (Aiden Markram SH Captain)

मार्करामची आयपीएलमधील कामगिरी

मार्करामने आयपीएलमध्ये 20 सामने खेळले असून 40.54 च्या सरासरीने 527 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 134.10 आहे. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकांसह 37 चौकार आणि 23 षटकार ठोकले आहेत. गेल्या वर्षी त्याने 14 सामने खेळले आणि 47.63 च्या सरासरीने 381 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 68 धावा होती.

‘एसआरएच’नी का बदलला कर्णधार? (aiden markram srh captain)

आयपीएल 2022 मध्ये एसआरएचची कामगिरी निराशाजनक ठरली. केन विल्यमसन हा संघाचा कर्णधार होता आणि त्यांनी 14 पैकी 8 सामने गमावले. या संघाची गुणतालिकेत 8 व्या स्थानी घसरा झाली. यानंतर संघ व्यवस्थापनाने विल्यमसनला कर्णधारपदावरून हटवले. यंदाच्या लिलावात फ्रँचायझीने मयंक अग्रवालला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर तो कर्णधार होईल अशी अटकळ बांधली जात होती, पण संघाने मार्करामला कर्णधार म्हणून निवडले.

आयपीएलसाठी ‘एसआरएच’चा पूर्ण संघ

फलंदाज : हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग.
अष्टपैलू : समर्थ व्यास, सनवीर सिंग, मयंक डागर, विव्रत शर्मा, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
गोलंदाज : उमरान मलिक, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील हुसेन, आदिल रशीद, मयंक मार्कंडे.

दिल्लीचे नेतृत्व कुणाकडे?

यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या दहा संघांपैकी दोन संघ असे होते ज्यांना त्यांच्या कर्णधारांची घोषणा करावी लागणार होती. त्यापाइकी हैदरबादने आपल्या कर्णधारावर शिक्कामोर्तब केला आहे. आता केवळ दिल्ली कॅपिटल्स संघ उरला आहे, ज्याला आपला कर्णधार घोषित करायचा आहे.

Back to top button