Ashwin-Jadeja : अश्विन-जडेजा जोडीच्या निशाण्यावर कुंबळे-भज्जीचा ‘हा’ विक्रम! | पुढारी

Ashwin-Jadeja : अश्विन-जडेजा जोडीच्या निशाण्यावर कुंबळे-भज्जीचा ‘हा’ विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwin-Jadeja : अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या फिरकी जोडीचा एक खास विक्रम लवकरच मोडीत निघणार आहे. या माजी खेळाडूंना भारताच्याच रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने आव्हान दिले आहे.

कुंबळे आणि भज्जी यांनी एकत्र खेळडून आपल्या फिरकीच्या जोरावर 54 कसोटी सामन्यात 501 विकेट घेतल्या. यामध्ये कुंबळे 281 आणि हरभजन सिंग 220 विकेट घेण्यात यशस्वी ठरले. आता आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा माजी दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. अश्विन-जडेजा जोडीने 45 सामन्यात 462 विकेट घेतल्या आहेत. यात अश्विनने 248 तर जडेजाने 214 बळी मिळवले आहेत. सरासरी बघितली तर पुढच्या 4-5 सामन्यांमध्ये ही जोडी कुंबळे-भज्जीच्या जोडीला मागे टाकेल. अश्विन आणि जडेजानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटीत 31 बळी घेतले. वेगवान गोलंदाजांना 9 बळी मिळाले. (Ashwin-Jadeja)

कुंबळे आणि भज्जीपूर्वी बीएस चंद्रशेखर आणि बिशन सिंग बेदी या फिरकी जोडीने 42 कसोटीत 368 विकेट घेतल्या होत्या. कुंबळे-भज्जी आणि अश्विन-जडेजा यांच्यानंतर कसोटी क्रिकेट जगतात ही एकमेव जोडी आहे, ज्यांनी एकत्र खेळताना 350 हून अधिक फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. (Ashwin-Jadeja)

Back to top button