IndvsAus 2nd Test : टीम इंडिया दिल्ली कसोटी जिंकण्याच्या उंबरठ्यावर | पुढारी

IndvsAus 2nd Test : टीम इंडिया दिल्ली कसोटी जिंकण्याच्या उंबरठ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी दिल्ली कसोटीच्या तिस-या दिवशी कांगारूंना त्यांच्या दुस-या डावात सळो की पळो करून सोडले. या दोघांनी अवघ्या दीड तासात ऑस्ट्रेलियाचे नऊ फलंदाज तंबूत पाठवून संपूर्ण संघ 113 धावांमध्ये गारद केला. याचबरोबर एका धावेच्या आघाडीसह पाहुण्या संघाने भारतापुढे विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य ठेवले. जडेजाने सात तर आर अश्विनने तीन बळी मिळवून कांगारूंचा धुव्वा उडवला. कांगारूंसाठी ट्रॅविस हेड (43), आणि लॅबुशेन (35) यांनाच दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.

भारताची धावसंख्या 24 षटकात 4 बाद 97 झाली असून विजयासाठी अजून 18 धावांची गरज आहे.

लंच ब्रेकेनंतर पुन्हा खेळ सुरू

लंच ब्रेकेनंतर पुन्हा खेळ सुरू झाला. पण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. भारताची दुसरी विकेट 38 धावांवर पडली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 20 चेंडूत 31 धावा करून धावबाद झाला. पुजारासोबत झालेल्या गैरसमजामुळे त्याला विकेट गमवावी लागली. रोहितने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

भारताची खराब सुरुवात

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुलच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. डावाच्या दुस-याच षटकात लायनने त्याला विकेटकीपर करवी झेलबाद केले. लंच ब्रेकसाठी खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 1 बाद 14 होती. रोहित शर्मा 12 आणि चेतेश्वर पुजारा 1 धाव करून क्रिजवर आहेत.

भारताची खराब सुरुवात

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुलच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. डावाच्या दुस-याच षटकात लायनने त्याला विकेटकीपर करवी झेलबाद केले.

ऑस्ट्रेलियन संघ 113 धावांवर गारद

रवींद्र जडेजाने कुहनमनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावांत गुंडाळला. कुहनमनने दोन चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही.

ऑस्ट्रेलियाच्या नऊ विकेट

113 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. रवींद्र जडेजाने नॅथन लायनला बोल्ड केले. लियॉनने 21 चेंडूत आठ धावा केल्या. जडेजाची या डावातील ही सहावी ठरली.

जडेजाचा पंच

27.1 व्या षटकात रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह जडेजाने पाच विकेट पूर्ण केल्या. कॅरीने 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सात धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया 100 पार…

ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावून 100 धावांचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या दिवशी भारताने अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या तासातच ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट्स मिळवल्या. जडेजाला चार आणि अश्विनला तीन विकेट मिळाल्या.

ऑस्ट्रेलियाची सहावी, सातवी विकेट

रवींद्र जडेजाने 23.1 व्या षटकांत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने पीटर हँड्सकॉम्बला विराट कोहलीकरवी शून्यावर झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर (23.2) भारताला सातवे यश मिळाले. जडेजाने पॅट कमिन्सला क्लिन बोल्ड केले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 बाद 95 होती.

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट

रवींद्र जडेजाने 23.1 व्या षटकांत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने पीटर हँड्सकॉम्बला विराट कोहलीकरवी शून्यावर झेलबाद केले.

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

22.6 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 95 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रविचंद्रन अश्विनने मॅट रेनशॉला पायचीत करत कांगारू संघाला पाचवा धक्का दिला. रेनशॉने आठ चेंडूंत दोन धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट

भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या सत्रातच अश्विन-जडेजा जोडीने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यानंतर मार्नस लबुशेन देखील तंबूत परतला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड करून 95 धावांवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. लबुशेनने 50 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

85 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपली शिकार बनवले. स्मिथने 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने नऊ धावा केल्या. अश्विनच्या चेंडूवर स्वीप करण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅडवर आदळला. अश्विनने जोरदार अपील केले. मैदानी पंचांनी स्मिथला बाद दिले. मात्र, स्मिथने रिव्ह्यू घेतला, पण तो स्वत:ला वाचवू शकला नाही. 20 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन बाद 90 होती.

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला यश मिळवून दिले. दुसऱ्या डावात 65 धावांच्या स्कोअरवर त्याने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड 46 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक श्रीकर भरतने त्याचा झेल टिपला. हेडने आपल्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 14 षटकांनंतर 2 बाद 66 अशी होती.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला जात आहे. सामन्याचा आज (दि. 19) तिसरा दिवस असून खेळ सुरू झाला आहे. या दिवसाला मूव्हिंग डे म्हटले जाते कारण सामन्याचा तिसरा दिवस खूप मनोरंजक असतो. या सामन्यातही दिल्लीकरांना असेच काहीसे पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला यश मिळवून दिले. दुसऱ्या डावात 65 धावांच्या स्कोअरवर त्याने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड 46 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक श्रीकर भरतने त्याचा झेल टिपला. हेडने आपल्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 14 षटकांनंतर 2 बाद 66 अशी होती.

दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला श्रेयस अय्यरकरवी झेल बाद करून भारताला यश मिळवून दिले होते. कांगारू संघाला पहिल्या डावाच्या आधारे एक धावांची आघाडी मिळाली.

Back to top button