Cheteshwar Pujara : १०० व्या कसोटीत ‘हा’ विक्रम करण्यासाठी गावसकरनी दिल्या पुजाराला शुभेच्छा! | पुढारी

Cheteshwar Pujara : १०० व्या कसोटीत 'हा' विक्रम करण्यासाठी गावसकरनी दिल्या पुजाराला शुभेच्छा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी आपल्या कसोटी कारकिर्दितील १०० वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारालाचा गौरवाचा छोटासा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर याच्या हस्ते पुजाराला १०० व्या कसोटीसाठी कॅप देण्यात आली. (Cheteshwar Pujara)

यावेळी पुजारा म्हणाला की, ‘सुनिल गावसकर यांच्याकडून कॅप मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, सुनिल गावसकर हे माझे प्रेरणास्थान आहेत. मला पहिल्यापासून भारतीय संघाकडून क्रिकेट खेळायचे होते. परंतु, टीम इंडियाकडून मी १०० कसोटी सामने खेळेन असे कधी वाटले नव्हते. आपली १०० वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी टीम इंडियाने देखील खास सेलिब्रेशन केले. यावेळी टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (Cheteshwar Pujara)

दरम्यान, सुनिल गावसकर यांनी चेतेश्वर पुजाराचे १०० कसोटी खेळणाऱ्यांच्या क्लबमध्ये स्वागत केले. याबरोबर सुनिल गावसकर पुजाराचे कौतुकही केले. त्यांनी पुजाराला भारताकडून १०० व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून भारताचा १०० व्या कसोटीत शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपूट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा;

Back to top button