AUSWvsINDW : गुलाबी चेंडूवर स्मृतीचा विक्रम, इतरांकडून निराशा | पुढारी

AUSWvsINDW : गुलाबी चेंडूवर स्मृतीचा विक्रम, इतरांकडून निराशा

क्विन्सलँड : पुढारी ऑनलाईन

भारतीय महिला क्रिकेट आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील ( AUSWvsINDW ) पहिल्या गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यात स्मृती मानधनाने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. याचबरोबर ती गुलाबी चेंडूवरील पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. मात्र स्मृती मानधना १२७ धावा करुन बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

पहिल्या दिवशीचा बराचसा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला होता. कालच्या ४४.१ षटकात १ बाद १३४ धावांपासून भारताने पुढे खेळण्यास सुरुवात केली. काल ८० धावांवर खेळणाऱ्या स्मृती मानधनाने आज आपले शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील तिचे हे पहिलेच शतक आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला ( AUSWvsINDW ) संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळत आहे. या पहिल्या सामन्यातच स्मृतीने शतक ठोकले. शतकानंतरही स्मृतीने जबाबदारीने खेळ करत संघाला २०० धावांच्या जवळ पोहोचवले.

स्मृती – पूनमची शतकी भागीदारी ( AUSWvsINDW )

दुसऱ्या बाजूने स्मृती मानधनाला साथ देणाऱ्या पूनम राऊत तिला सावध साथ देत आहे. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचली. मात्र ही शतकी भागीदारी ग्रँडनरने तोडली. तिने शतकवीर स्मृती मानधनाला १२७ धावांवर बाद केले. स्मृती बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राज खेळपट्टीवर आली. ( AUSWvsINDW )

पूनम राऊत आणि मिताली राजने भारताला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र सेट झालेल्या पूनम राऊतला चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. ती ३६ धावा करुन मोलिन्युक्सच्या गोलंदाजीवर बाद झाली. राऊत बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राज आणि यस्तिका भाटियाने डिनर ब्रेक पर्यंत भारताला २३१ धावांपर्यंत पोहचवले. खेळ थांबला त्यावेळी मिताली १५ तर भाटिया २ धावा करुन नाबाद होत्या. ( AUSWvsINDW )

डिनर ब्रेकनंतर मिताली यस्तिकाची भागीदारी ( AUSWvsINDW )

डिनर ब्रेकनंतर मिताली राज आणि यस्तिका भाटिया यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघींनी भारताला २५० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र ही भागीदारी अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच संपुष्टात आली. मिताली – यस्तिकाची ४४ धावांची ही भागीदारी पेरीने संपवली. तिने यस्तिकाला १९ धावांवर बाद केले.

यस्तिका बाद झाल्यानंतर मिताली राजही लगेचच बाद झाली. तिला सदरलँडने ३० धावांवर धावबाद केले. भारताचा निम्मा संघ २७४ धावात माघारी गेल्यानंतर पुन्हा वातावरण खराब झाले आणि खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी दिप्ती शर्मा १२ तर तानिया भाटिया शुन्य धावावर नाबाद होती.

हेही वाचले का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button