Border-Gavaskar Trophy : कपिल देव यांची भविष्‍यवाणी, ‘हा’ संघ जिंकणार २-१ अशी मालिका | पुढारी

Border-Gavaskar Trophy : कपिल देव यांची भविष्‍यवाणी, 'हा' संघ जिंकणार २-१ अशी मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात होणार्‍या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून ( दि. ९) नागपूर येथे सुरु होणार आहे. ( Border-Gavaskar Trophy ) कसोटी विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात धडक मारण्‍यासाठी टीम इंडियासाठी ही मालिका खूपच महत्त्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे क्रिकेटप्रेमींसह माजी क्रिकेटपटूंनाही या मालिकेच्‍या निकालाबाबत विशेष उत्‍सूकता आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ही मालिका कोणता संघ जिंकणार, याबाबत भविष्‍यावाणी केली आहे. जाणून घेवूया कपिल देव काय म्‍हणाले या विषयी…

Border-Gavaskar Trophy : शुभमन असावा सलामीवीर

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव म्‍हणाले की, कर्णधार रोहित शर्मा याने शुभमन गिल याला संघात स्‍थान द्यावे. तसेच या मालिकेत रोहित शर्माबरोबर शुभमन यानेच सलामीला यावे. पहिल्‍या कसोटीतच शुभमन याला संधी देण्‍यात यावी. तसेच केएल राहुल पूर्ण फिट असेल तरच त्‍याला संघात स्‍थान देण्‍यात यावे. त्‍याला जबरदस्‍तीने संघात स्‍थान देवू नये. जे खेळाडू जखमी होते. त्‍यांनी टीम इंडियात पुनरागमन करताना देशातंर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

‘हा’ संघ जिंकेल मालिका

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात हो‍णारी कसोटी मालिका भारतीय संघ २-१ जिंकेल,अशी भविष्‍यावाणी करत कपिल देव म्‍हणाले की, सूर्यकुमार यादव हा उत्‍कृष्‍ट फलंदाज आहे. मात्र तो क्रिकेटमधील टी-२० चा खेळाडू आहे. कसोटी क्रिकेट हा वेगळा प्रकार आहे. तुम्‍ही त्‍याला खेळवणार असाल तर त्‍याने आधी रणजी ट्रॉफीमध्‍ये खेळने आवश्‍यक आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

ऋषभ पंत याची उणीव भासणार

भारतीय संघाला ऋषभ पंत याची उणीव भासणार आहे. तसेच संघात चार फिरकी गोलंदाज असणेही चुकीचे ठरेल. कर्णधाराने खेळपट्टीचा विचार करुन जास्‍तीत जास्‍त तीन फिरकी गोलंदाज खेळवले पाहिजेत, असेही ते म्‍हणाले.

भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज आणि मोहम्‍मद शमी या दोघांनाही स्‍थान मिळायला हवे. कारण या दोन्‍ही गोलंदाजांकडे विकट घेण्‍याची क्षमता आहे. तसेच फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळायलाच हवी. त्‍याचबरोबर अश्‍विनचाही फिरकी गोलंदाज म्‍हणून संघात समावेश असावा, असेही कपिल देव यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button