SA20 : जिमी निशमची कमाल, अप्रतिम कॅच पाहिलात का? | पुढारी

SA20 : जिमी निशमची कमाल, अप्रतिम कॅच पाहिलात का?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सध्‍या दक्षिण आफ्रिकेत सुरु असणार्‍या SA20 लीग स्‍पर्धेतील रोमांच शिगेला पोहचला आहे. या स्‍पर्धेत क्रिकेटपटूंचा खेळ बहारत असून, दररोज नवनवीन कारनामे पाहायला मिळत आहेत. रविवारी या लीगमधील सामन्‍यात जिमी निशम याने हवेत उडी घेत अप्रतिम झेल पकडला. निशमच्‍या क्षेत्ररक्षणाने बाद झालेल्‍या फलंदाजासह प्रेक्षकही आवाक झाले. या क्षणाचा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे.

रविवारी SA20 लीगचा २८ वा सामना डर्बन सुपर जायंट्‍स आणि प्रिटोरिया कॅपटल्‍समध्‍ये झाला. डर्बनने प्रथम फलंदाजी करता २० षटकात २५४धावा केल्‍या. प्रत्युत्तरात प्रिटोरिया कॅपिटल्सचा संघ १३.५ षटकांत अवघ्या १०३ धावांत गुंडाळला गेला. डर्बन सुपर जायंट्सने हा सामना तब्‍बल १५१ धावांनी जिंकला. या कामगिरीमुळे या संघाला बोनस गुणही मिळाल्‍याने उपांत्य फेरीत धडक मारण्‍याच्‍या संघाच्‍या आशा जिवंत राहिल्‍या आहेत.

SA20 :  चर्चा निशमच्‍या कॅचची

डरबन सुपरजायंट्सच्या डावात जिमी निशम पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. विआन मुल्डर याने जबरदस्‍त फटका मारला; पण  निशमने डावीकडे हवेत उडी घेत अप्रतिम झेल पकडला. प्रिटोरिया कॅपिटल्ससाठी खेळताना निशमने केलेल्‍या सर्वोत्‍कृष्‍ट क्षेत्ररक्षणाच्‍या प्रदर्शनाने फलंदाजासह प्रेक्षकही आवाक झाले.

फलंदाजासह समालोचकही झाले आवाक

डर्बन सुपर जायंट्‍सचा  फलंदाज विआन मुल्डर याने निशमला झेल घेताना पाहून त्याच्या क्षणभर आपण बाद झालो यावर विश्वासच बसला नाही. या वेळी समालोचक पॉमी एमबांगवा देखील आश्चर्यचकित झाल्‍याचे दिसले. डर्बन सुपर जायंट्सच्या डावातील 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने हा झेल टिपला. जोशुआ लिटल १४ वे षटक टाकत होता. प्रिटोरिया कॅपिटल्सने सामना गमावला असला तरी या संघाच्‍या जिमी निशमचा झेल क्रिकेटप्रेमींमध्‍ये चर्चेचा विषय ठरला.

 

 

 

Back to top button