Digital Strike 2.0 : चीनच्या ‘138 बेटिंग’ आणि ’94 लोन लँडिंग’ ॲप्सवर भारताकडून बंदी, लिंकसह ॲप ब्लॉकिंगची तातडीची प्रक्रिया सुरू | पुढारी

Digital Strike 2.0 : चीनच्या '138 बेटिंग' आणि '94 लोन लँडिंग' ॲप्सवर भारताकडून बंदी, लिंकसह ॲप ब्लॉकिंगची तातडीची प्रक्रिया सुरू

पुढारी ऑनलाइन डेस्क : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाशी चर्चा करून आज Digital Strike 2.0 : चीनच्या 138 बेटिंग आणि 94 लोन लँडिंग ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसेच चिनी लिंकसह असलेल्या या ॲप्सना तातडीने ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात भारताने शेकडो चिनी ॲप्स आधीच ब्लॉक केले आहेत. त्यानुसार आजची ही कारवाई खूप मोठी मानली जात आहे.

भारत सरकार गेल्या काही वर्षापासून धोकादायक चिनी ॲप्सवर सातत्याने कारवाई करत आहेत. यापूर्वी सरकारने वेळोवेळी चीनच्या अनेक मोठ्या ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय ॲप्सचा समावेश होता. त्यानंतर आता मोदी सरकारने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला धोकादायक असलेल्या ॲप्सवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चिनी लिंकसह 138 बेटिंग आणि 94 लोन लँडिंग ॲप्सवर बंदी घातली.

Digital Strike 2.0 : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, गृह मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर चिनी लिंक असलेल्या अॅप्सला या लिंकसह तातडीने ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Digital Strike 2.0 : दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा आणणारी सामग्री आहे, जी IT कायद्याच्या प्रलोभन विषयक कलम 69 ला भंग करते. या माहितीची खात्री केल्यानंतर या ॲप्सवर तातडीने बंदी टाकून ब्लॉक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यावेळी सल्ला दिला आहे की, देशाच्या बहुतांश भागांमध्ये बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर असल्याने, या बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती तसेच त्यांच्या सरोगेट्स देखील ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायदा 1995 आणि आयटी नियम, 2021 च्या तरतुदींनुसार बेकायदेशीर आहेत.

बंदी घालण्यात आलेले ॲप्स व्यक्तींना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याच्या आमिषाने स्वतःकडे आकर्षित करतात. तसेच याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचा डेटा आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. याशिवाय याचा वापर हेरगिरी आणि प्रचाराची साधने म्हणूनही त्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो, असे न्यूज 18 ने म्हटले आहे.

Digital Strike 2.0 : चिनी ॲप्सविरोधात भारताची कारवाई

गेल्या काही वर्षांत, भारत सरकारने सुमारे 250 चिनी ॲप्स “भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांच्यासाठी प्रतिकूल” असल्याचे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने आतापर्यंत TikTok, Xender, Shein, Camscanner सारख्या ॲप्सवर बंदी घातली आहे जे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते आणि लाखो डाउनलोड होते. सरकारने आतापर्यंत जून 2020 मध्ये 59 ॲप्स, नोव्हेंबर 2020 मध्ये 43 ॲप्स आणि गेल्या वर्षी 54 चायनीज ॲप्सवर बंदी घातली आहे.

Back to top button