टिळा लावला नाही म्हणून सिराज, मलिक झाले ट्रोल | पुढारी

टिळा लावला नाही म्हणून सिराज, मलिक झाले ट्रोल

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वीच टीम इंडियाचे दोन महत्त्वाच्या खेळाडूंना मुद्दाम ट्रोल केले जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारतीय संघातील खेळाडू हॉटेलमध्ये जाताना त्यात दिसत आहेत. यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी कपाळावर टिळा लावण्याचा नकार दिल्याचे दिसत आहे. या कारणामुळे दोघांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, अनेक चाहतेही त्यांच्या या कृतीला पाठिंबा देत आहेत. सिराजखेरीज भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्रीडा कर्मचारी सदस्य हरिप्रसाद मोहन यांनीही टिळा लावला नाही, मात्र ट्रोलकरी मुद्दाम सिराज आणि उमरान यांना टार्गेट करत प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Back to top button