IND vs AUS Test : कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटीला मुकणार?

IND vs AUS Test : कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटीला मुकणार?
Published on
Updated on

बंगळूर, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Test) ही कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना पाहुण्या संघातून एक महत्त्वाची माहिती आली आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनची दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नसून त्याला पहिल्या कसोटीत खेळवण्याचा धोका संघ व्यवस्थापन घेणार नसल्याचे संकेत ऑस्ट्रेलियन कर्णधाराने दिले आहेत.

दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण अशा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी 2023 मध्ये नागपुरात होणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या म्हणण्यानुसार, कॅमेरूनला पहिल्या कसोटीत खेळवणे कठीण जात आहे. कॅमेरून ग्रीन अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एस. भरत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारताच्या दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, पीटर हँडस्कॉम्ब, लान्स मॉरिस, अ‍ॅश्टन अगर, मिचेल स्वीपसन, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड.

पॅट कमिन्सचे वक्तव्य (IND vs AUS Test)

या महत्त्वाच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात पोहोचला असून बंगळूरमध्ये त्यांनी सराव सुरू केला आहे. पॅट कमिन्सने कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहेत. फॉक्स स्पोर्टस्सोबत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, 'मला माहीत आहे की तो (पहिल्या कसोटीत) गोलंदाजी करू शकत नाही. पुढील आठवडा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याला या दुखापतीमुळे अद्याप बर्‍याच गोष्टी करण्यासाठी अडथळा येत आहे. आम्हाला आशा आहे की, पुढच्या आठवड्यात तो ठीक होईल. ग्रीनला पुढच्या आठवड्यापर्यंत ठीक वाटले नाही तर या सामन्यात त्याला खेळता येणार नाही.'

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा :

पहिला कसोटी सामना- 9 ते 13 फेब्रुवारी नागपूर
दुसरा कसोटी सामना – 17 ते 21 फेब्रुवारी दिल्ली
तिसरा कसोटी सामना – 1 ते 5 मार्च धर्मशाला
चौथा कसोटी सामना – 9 ते 13 मार्च अहमदाबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news